युवा शेतकरी गणेश गवळी sakal
सोलापूर

Solapur: साखर पट्ट्याला लागली स्ट्रॉबेरीची गोडी, ४५ डिग्री तापमानात शेतीचा प्रयोग यशस्वी

युवा शेतकरी गणेश गवळीचा प्रयोग यशस्वी

- भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर पट्ट्यात स्ट्रॉबेरी शेतीची अनेक तरुण शेतकऱ्यांना गोडी लागली आहे. भाळवणी (ता. पंढरपूर) येथील गणेश गवळी या तरुणाने खडकाळ माळरानावर स्ट्रॉबेरी शेतीचा नवा प्रयोग यशस्वी केला आहे. ४५ डिग्रीपर्यंत उष्ण हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यात उसाबरोबरच आता स्ट्रॉबेरीची शेतीसुध्दा चांगली पिकते हे त्याने प्रयोगांती सिद्ध करुन दाखवले आहे. मागच्या वर्षीच्या

अनुभवाच्या जोरावर त्याने यंदा पाच गुंठे क्षेत्रावर दीड हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. यातून दोन लाखाचे उत्पन्न मिळेल, अशी गणेशला अपेक्षा आहे. पंढरपूर तालुक्यात ऊस, केळीसह इतर फळ पिकांचे क्षेत्र मोठे आहे. अशा पारंपारिक पिकाबरोबरच कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारी पिके घेतली जावू लागली आहेत. यामध्ये आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. कृषी पदवी घेतलेल्या गणेश गवळी या तरुणाने या निमित्ताने शेतीमध्ये नवीन वाट शोधली आहे. गवळी यांच्या शेतात आजही ऊस, केळी, मका या सारखी पिके घेतली जातात. वडील शुक्राचार्य गवळी यांनी दोन वर्षापूर्वी घराजवळ पाच गुंठे क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड केली आहे. त्यामध्ये कोणते अंतरपीक घेता येईला याचा विचार करत असताना स्ट्रॉबेरी लागवड करण्याची कल्पना गणेशला सुचली. त्यातूनच त्याने गेल्यावर्षी दोन गुंठे क्षेत्रामध्ये विंटर डाऊन वाणाची लागवड केली होती. त्यावर्षी १५० किलो स्ट्राँबेरीचे उत्पादन मिळाले होते. स्थानिक बाजारात चारशे रुपये किलोचा भाव मिळाला होता.

मागच्या वर्षीच्या अनुभव लक्षात घेवून त्यामध्ये काही नवीन सुधारणा करुन पाच गुंठे क्षेत्रामध्ये दीड हजार रोपांची लगवड केली आहे. लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यामुळे चांगली फळधारणा झाली आहे. सध्या स्ट्रॉबेरी फळांची काढणी सुरू झाली आहे. दोन दिवसापूर्वी पाच किलोचा पहिला तोडा करण्यात आला. पंढरपूर येथील बाजारात चारशे रुपयांचा भाव मिळाला. यावर्षी सातशे किलो स्ट्रॉबेरी फळांच्या उत्पादनातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न हाती येईल. तीस हजार रुपयांचा खर्च वजा जाता त्याला अवघ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा निवळ्ळ नफा हात मिळेल, अशी त्याला अपेक्षा आहे. कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक नफा मिळवून देणारी स्ट्रॉबेरीची शेती दुष्काळी भागातील तरुण शेतकऱ्यांना आता खुणावू लागली आहे.

अशी केली स्ट्रॉबेरी लागवड.....

खडकाळ असलेल्या जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरट केली. त्यामध्ये दोन बैलगाडी शेणखत टाकले. त्यानंतर बैलांकडून फणपाळी केली. समान तीन फूट अंतरावर साधारण ४५ सेंटिमीटर उंचीचे बेड तयार केले. मल्चिंग पेपर टाकून त्यावर स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली. लागवडीदरम्यान खतांचे व पाण्याचे योग्य नियोजन केले. सध्या लाल चुटूक आणि चविष्ट स्ट्रॉबेरीला स्थानिक बाजारात मागणी वाढली आहे. शिवाय स्ट्रॉबेरी शेतीच्या नव्या प्रयोगविषयी शेतकऱ्यांमध्ये उत्सूकताही वाढली आहे.

पंढरपूरसह अनेक भागात विविध शेती पिकांचे प्रयोग केले जात आहेत. यामध्ये सफरचंद, स्ट्रॉबेरी, अंजीर, काजू या सारख्या थंड हवामानामध्ये येणाऱ्या फळपिकांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा उष्ण हवामानाचा प्रदेश आहे. पीक हे कोणत्याही भागात येवू शकते. परंतु रंग, चव आणि फळांचे गुणधर्म जसेच्या तसे त्यामध्ये उतरतील का हे पाहावे लागेल. सलग तीन चार वर्षे अशी पिके घेतल्यानंतर त्या पिकांविषयाचे विश्लेषण करता येईल. प्रयोग म्हणून नवीन पीक पध्दतीचा अवलंब करणे कधीही चांगेल आहे. शासनाकडून अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहान देण्यात येईल.

- भागवत सरडे,तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT