Solapur Crime esakal
सोलापूर

सोलापूर शहर पोलिसांनी पकडला अट्टल चोर! दिवसा बंद घरे शोधायचा अन्‌ रात्री करायचा चोरी, चोरीचे निघाले १२ गुन्हे, दरवेळी बदलायचा साथीदार, वाचा...

दिवसा परिसरातील बंद घरे हेरून रात्री घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याने वेगवेगळ्या साथीदारांची मदत घेतली होती. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली किंवा संरक्षक भिंत नसलेली बंद घरे हेरून तो रात्री चोरीचा डाव साधत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवसा परिसरातील बंद घरे हेरून रात्री घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी १२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याने वेगवेगळ्या साथीदारांची मदत घेतली होती. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे नसलेली किंवा संरक्षक भिंत नसलेली बंद घरे हेरून तो रात्री चोरीचा डाव साधत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पूना नाका परिसरातील नाकोडा रेसिडेन्सी फेज-२ येथील कापड व्यावसायिक भरत कमलकिशोर काबरा यांचे चुलत बंधू धीरज मुरलीधर काबरा हे कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्याचाच फायदा घेत १४ जून रोजी त्यांच्या बंद घरात चोरी करण्यात आली. चोरट्याने घरातील सुमारे सव्वा लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भरत काबरा यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर यांच्या पथकाने संतोष संजय कांबळे (वय ३६, रा. जय मल्हार चौक, आडवा नळ, बुधवार पेठ) याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने साईनाथ संतोष मोरे (रा. बाळे), चंद्रकांत सौदागर मोरे (वय २०, रा. जय मल्हार चौक) आणि भारत विलास आखाडे (वय २०, रा. कळके वस्ती, जुना कारंबा नाका) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल आणि दोन दुचाकी वाहने असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फौजदार चावडी आणि जोडभावी पेठ पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

चमकणारे सोने बनावट समजून घरातच सोडले

धीरज काबरा यांच्या घरात सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने होते. चोरी करताना संतोष कांबळेच्या हाती चार ते पाच तोळे वजनाचे काही दागिने लागले. ते दागिने अधिक चमकत असल्याने त्याला ते बनावट असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने ते दागिने घरातच ठेवले आणि इतर दागिने तसेच रोकड घेऊन तेथून पलायन केले, अशी माहितीही तपासात समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT