Salil Ankola
Salil Ankola 
सोलापूर

सोलापूरच्या या क्रिकेटरने इम्रान खानला पहिल्याच बॉलवर मारला सिक्‍स ! अन्‌ बॉलिंगला आल्यावर...

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : क्रिकेट विश्‍वात अनेक किस्से घडत असतात व अनेक रेकॉर्ड झाले आहेत व आजही नवनवे रेकॉर्ड केले जात आहेत. मात्र एक रेकॉर्ड असा झाला, की पाकिस्तानचा ऑलराउंडर इम्रान खानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलीच मॅच खेळणाऱ्या सोलापूरच्या क्रिकेटरने आपल्या पहिल्याच बॉलमध्ये आउट केले होते. तर इम्रानच्या वेगवान बॉलिंगचा सामना करताना त्याच्या पहिल्याच बॉलमध्ये सिक्‍सही ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. 

तो सोलापूरचा क्रिकेटर होता उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करणारा सलिल अंकोला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच इम्रान खानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. इम्रानच्या पहिल्या बॉलमध्ये सिक्‍सर मारणाराही सलिलच होता. तो वेगवान गोलंदाज होता. त्याचा रनअप हटके होता. मात्र तो क्रिकेटपेक्षा त्याच्या चित्रपट करिअरनेच ओळखला जाऊ लागला. 

क्रिकेटर व अभिनेता सलिल अंकोला, ज्याचा जन्म सोलापुरात 1 मार्च 1968 झाला. मात्र त्याचे मूळ कुटुंब कारवार (कर्नाटक) येथील आहे. हा एक सिने अभिनेता आणि माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. सलिलने 1989 ते 1997 या कालावधीत भारताकडून एक कसोटी सामना आणि वीस एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र त्याची क्रिकेट कारकीर्द ऐनवेळी अंधारात गेली अन्‌ क्रिकेटपेक्षा तो अभिनयात जास्त रमला. 

जागतिक क्रिकेट विश्‍वात 1989 मध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू उदयास आले. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, स्विंगचा जादूगार वकार युनूस, स्फोटक फलंदाज सनथ जयसूर्या, सईद अन्वर, इंग्लंडचा कॅप्टन नासीर हुसेन, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मार्क टेलर, रॉबिन सिंग, पाकिस्तानचा मुश्‍ताक अहमद व सलिल अंकोला... अशी लांबलचक यादी होईल दिग्गज क्रिकेटपटूंची. मात्र यातील अनेक क्रिकेटर्सने मैदान गाजवले मात्र यातील एक क्रिकेटर मात्र चित्रपटसृष्टीत रमला, तो म्हणजे सलिल अंकोला. 

वयाच्या विसाव्या वर्षी रणजीमध्ये महाराष्ट्राकडून खेळायची संधी मिळालेल्या सलिलने फर्स्ट क्‍लास सिरीजमध्ये गुजरातविरुद्ध सहा विकेट्‌स मिळवल्या व यात हॅट्ट्रिकचाही समावेश होता. या सिझनमध्ये त्याने 27 विकेट्‌स घेतल्या. 

1989 च्या पाकिस्तान दौऱ्यात सराव सामन्यातच सहा विकेट्‌स घेऊन सलिलने हवा निर्माण केली. मात्र पहिल्याच कसोटी मॅचमध्ये सलिलच्या गोलंदाजीची धुलाई झाली. कपिल देवच्या गोलंदाजीमुळे ही मॅच ड्रॉ झाली मात्र यादरम्यान सलिल जखमी झाला व टीमबाहेर पडला. पुढील कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. मात्र एकदिवसीय सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने इम्रानला एक धावावर असताना आउट करत दोन विकेट्‌स घेतल्या. तसेच भारताला विजयासाठी एका षटकात 25 धावा हव्या असताना सलिलने इम्रानची गोलंदाजी फोडून काढली. इम्रानच्या बॉलवर त्याने सिक्‍सर मारून आशा जिवंत ठेवल्या मात्र ती मॅच भारत जिंकू शकला नाही, पण सलिल अंकोला फेमस झाला. 

त्यानंतर मात्र सलिलची परदेशातील टेस्ट सिरीजसाठी निवड व्हायची पण प्रत्यक्षात खेळवलं जायचं नाही. पुढे पुढे त्याचे नाव राखीव खेळाडू म्हणून झालं. त्यामुळे त्याला खेळामध्ये सातत्य राखता आले नाही. 1996 च्या वर्ल्ड कपनंतर तो क्रिकेटमधून बाहेर पडला. अन्‌ वयाच्या 28 व्या वर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली. 

क्रिकेटची कारकीर्द संपुष्टात आली असताना काही वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीत झळकू लागला. संजय दत्तच्या "कुरुक्षेत्र' तसेच छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या "कोरा कागज'पासून "सावधान इंडिया', "विक्राल और गबराल', "शनिदेव'मध्ये सूर्यदेवाचे पात्र इथून ते "बिग बॉस', "फिअर फॅक्‍टर', "पॉवर कपल' अशा रिऍलिटी शोमधूनही त्याचे दर्शन झाले. 

मध्यंतरी सलिल कौटुंबिक डिप्रेशनमध्ये गेला होता. आता तो सावरला आहे. याच वर्षी त्याचा "द पॉवर' हा चित्रपट रिलीज झाला असून, क्रिकेटचे द्वारही त्याच्यासाठी उघडले गेले आहेत. त्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे. 

सलिल अंकोलाची चित्रपट कारकीर्द 

  • 1999 : कोरा कागझ (टीव्ही मालिका) 
  • 2000 : कुरुक्षेत्र 
  • 2002 : पीटा 
  • 2003 : चुरा लिया है तुमने 
  • 2004 : सायलेन्स प्लीज... ड्रेसिंग रूम 
  • 2012 : रिवायत 
  • 2018 : तेरा इंतजार 
  • 2021 : द पॉवर 

टीव्ही मालिका 

  • 1997 : शनिवार सस्पेन्स 
  • 1998-1999 : चाहत और नफरत 
  • 1998-2000 : लेकीन... वो सच था 
  • 1998-1999 : कोरा कागज 
  • 1999 : रिश्‍ते 
  • 2000-2001 : नूरजहॉं 
  • 2002-2005 : कहता है दिल 
  • 2003-2004 : श्‍शू...कोई है 
  • 2003-2004 : विक्राल और गबराल 
  • 2005 : जिंदगी तेरी मेरी कहानी 
  • 2006 : सीआयडी 
  • 2006 : अमर्यादित जोश 
  • 2006 : करम अपना अपना 
  • 2009-2010 प्यार का बंधन 
  • 2013 : सावित्री- एक प्रेम कहानी 
  • 2013 : सावधान इंडिया 
  • 2013 : कर्मफल दाता शनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये चढत असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT