solapur crime update Four injured in marriage stone pelting damage to bikes and rickshaws case registered against 20 persons esakal
सोलापूर

Solapur : लग्नात जेवण करताना राडा; दगडफेकीत चौघे जखमी; १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दुचाकी व रिक्षांचे मोठे नुकसान; पोलिसांनी १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उत्तर सदर बझार परिसरातील एका विवाह समारंभावेळी जेवायला बसलेल्या लोकांवर जवळपास २० जणांनी विटा, दगड व फरशीचे तुकडे फेकले. त्यात चौघेजण जखमी झाले असून दुचाकी व रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी गणेश सुरेश अंपेपागोलू (रा. स्लॅटर हाऊस, बापूजी नगर) यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. २८) रात्री साडेअकराच्या सुमारास काहीजण विवाहस्थळी आरडाओरड करीत आले. त्यावेळी गणेश अंपेपागोलू यांनी जाब विचारला. त्यावेळी अभिषेक चौधरी, गोविंद अंबेवाले, प्रकाश अंबेवाले, हिरा जमादार, आनंद पंतुवाले, शीतल खंडेवाले, राजू अंबवाले, नितीन अंबेवाले, कादर,

नीलेश ऊर्फ विचे यांच्यासह तर आठ ते दहा जणांनी तेथील विटा, दगड व फरशीचे तुकडे लोकांच्या दिशेने भिरकावले. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ राकेश याच्या विवाहानिमित्त जेवायला बसलेले नातेवाईक जखमी झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे

तथापि, पोलिसांनी १८ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार श्री. इनामदार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT