edible oil price  sakal
सोलापूर

सोलापूर : खाद्यतेलाच्या दरवाढीचा भडका सुरू

गृहिणींचे कोलमडले बजेट; मिठाईदेखील महागणार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: खाद्यतेलाचे भाव मागील आठवडाभरात २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने वाढले असून, त्यासोबत मिठाईचा बाजारदेखील भडकला आहे. हॉटेलिंग व्यवसायातदेखील आता खाद्यपदार्थांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाचे अर्थकारण हे अयातीवर सर्वस्वी अवलंबून आहे. पाम तेल हे मलेशियातून आयात होते. पाम तेलाचे भाव हे सर्वात कमी असतात. तसेच पाम तेलाचा वापर कमी किमतीमुळे अधिकाधिक प्रमाणात होतो. मिठायाच्या निर्मितीसाठीदेखील पामतेलाचा वापर अधिक होतो. आता नेमकी पामतेलाची आयात कमी झाली आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त किमतीच्या तेलाचा पर्याय संपला आहे. त्याचा परिणाम इतर खाद्यतेलाच्या पुरवठ्यावर मागणीचा दबाव वाढवणारा झाला आहे. त्या स्थितीत इतर खाद्यतेलाचे भावदेखील वाढले आहेत.

सूर्यफुलाच्या तेलाची सर्वाधिक आयात युक्रेनमधून होत असते. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने तेथून सूर्यफुल तेल मिळण्याचा मार्ग बंद झाला आहेत. तर स्थानिक शेंगा तेल पॅकिंगमध्ये फार मोठ्या प्रमाणात मिळत नाही. सोयाबीनचे बाजारात भाव वाढल्याने तेलाचे भावदेखील वाढले आहेत. एकंदरीत खाद्य तेलाचे भाव महिनाभरातच २० ते २५ रुपये किलोने भडकले आहेत. अजूनही या भावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

खाद्यतेलाच्या दरवाढीचा फटका मिठाई निर्मितीला बसतो आहे. मिठायांचे भाव पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढण्याशिवाय पर्याय नाही. खाद्यतेलाचे भाव आटोक्यात आले तरच मिठाईचे दर कमी होऊ शकतात. सध्यातरी भाववाढ अटळ आहे असे म्हणावे लागेल.

- नंदकिशोर तिवाडी, मिठाई व्यापारी, सोलापूर

खाद्यतेलाला महागाईचा तडका

सोयाबीनचे भाव वाढल्याने तेलाचे भाव वाढले

सुर्यफूल तेलाची युक्रेनमधून होणारी आयात युद्धामुळे ठप्प

शेंगा तेलाची मागणी स्थानिक व खुल्या विक्रीवर जोर

पामतेलाची आयात विस्कळीत

या हंगामात कापसाचे भाव वाढल्याने सरकी तेल महागण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT