solapur sakal
सोलापूर

Solapur ganeshotsav : मंगळवेढ्यात चंद्रयाण देखावा पाहण्यास गर्दी

मंडळाचे यंदाचे 49 वर्ष असून यापूर्वी अनेक उपक्रम त्यांनी राबवल्यामुळे त्यांना आदर्श गणेश मंडळाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi), हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - शहरातील शनिवार पेठ परिसरात छत्रपती शिवाजी तरूण मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात चंद्रयान- 3 देखावा तयार केला असून तो देखावा पाहण्यासाठी शहरासह परिसरातील गणेश भक्ताची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहेत.

शहर व ग्रामीण भागातून जवळपास 221 पेक्षा अधिक गणेश मंडळांनी मुर्तीची स्थापना केली. परंतु शहरांमध्ये जय जवान गणेश मंडळाबरोबर काही निवडक गणेश मंडळांनी प्रबोधनाचे देखावे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये शनिवार पेठेतील शिवाजी तालिम येथील छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचा उल्लेख करावा लागेल.

मंडळाचे यंदाचे 49 वर्ष असून यापूर्वी अनेक उपक्रम त्यांनी राबवल्यामुळे त्यांना आदर्श गणेश मंडळाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.2015 साली दुष्काळी गावांच्या प्रबोधनासाठी पाणी आडवा ,पाणी जिरवा यामधील नालाबल्डींगचा देखावा सादर केला, 2016 आदर्श गाव ,तर 2017 ला स्वच्छता अभियान, 2018 ला कोकण भागातील गणेश दर्शन, 2019 मध्ये काल्पनिक मंदिर, 2021 ला आकर्षक सजावट, 2022 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अशा देखाव्याना नगरपालिका व पोलिस स्टेशन कडून प्रत्येकी दोन वेळा पुरस्कार मिळालेले आहेत.

मूर्तीच्या गळ्यातील हार फेकून देण्याऐवजी निर्मल कलश अभियान राबवून ते सर्व हाल एकत्र करून त्याचे विल्हेवाट लावण्याचे काम या मंडळाने केले.यंदा भारताने चंद्रयान मोहीम यशस्वी केल्यामुळे त्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्याच्या दृष्टिकोनातून या मंडळांनी हा देखावा उभा करण्यात आलेला आहे यामध्ये यान अवकाशात झेप घेऊन ते लँडर चंद्रावर उतरल्याचा हा देखावा दर्शनीय केला आहे त्यामुळे हे हा देखावा पाहण्यासाठी आलेल्यांना काही वेळ आपण अवकाशात असल्याचा भास होतो

आमच्या मंडळाचे यंदा 49 वे वर्षे असून यापूर्वी आम्ही सेंद्रिय शेती, स्वच्छ भारत मिशन,जलसंधारण,पाणी आडवा पाणी झिरवा असे वेगवेगळे प्रबोधनाचे उपक्रम राबवले यंदा, भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याच्या आठवणीसाठी चंद्रयान मोहिमेचा देखावा सादर केला आहे.सुवर्ण महोत्सवी वर्षात संत सुष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आण्णा चौगुले, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी गणेश मंडळ, शनिवार पेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT