Solapur Ganpati Visarjan 2023 Municipal council police administration ready  sakal
सोलापूर

Solapur Ganpati Visarjan 2023 : मोहोळ तालुक्यातील गणेश विसर्जनासाठी नगरपरिषद व पोलीस प्रशासन सज्ज

94 गणेश मूर्तींचे विसर्जन जागेवरच होणार आहे, तर 47 गणेश मंडळे मिरवणुकीने विसर्जन करणार

सकाळ वृत्तसेवा

Solapur Ganpati Visarjan 2023 : मोहोळ तालुक्यातील गणेश विसर्जनाची नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, नगरपरिषद प्रशासनाने स्व. मीनाताई ठाकरे उद्यानात कृत्रिम हौद तयार केला आहे. तर अनेक गणेश मूर्तींचे विसर्जन लांबोटी ता मोहोळ येथील सीना नदीवरील जुन्या पुलावर होणार आहे.

94 गणेश मूर्तींचे विसर्जन जागेवरच होणार आहे, तर 47 गणेश मंडळे मिरवणुकीने विसर्जन करणार आहेत. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे या साठी 12 अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी व 45 होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

मोहोळ तालुक्यात चालू गणेशोत्सवात 46 ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली आहे. गुरुवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी लांबोटी नदीवरील जुन्या पुलावर एक अधिकारी व वीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार जातीय तेढ निर्माण करणारी कृत्ये होऊ नयेत यासाठी गाव कामगार पोलीस पाटलांना हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्र व गणेश मंडळांचे स्वयंसेवक यांचीही मदत घेण्यात आली आहे.

तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी प्रबोधन पर देखावे तयार करून समाजाचे प्रबोधन केले आहे. तसेच काही मंडळांनी डॉल्बी, मिरवणुका, गुलाल व वाजंत्री यांचा वापर टाळला आहे. अशा मंडळांना पोलीस विभागातर्फे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

त्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबविणारी मंडळे, ग्रामीण व शहरी विभाग अशा तीन मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन सदस्यीय "परीक्षण समिती" गठित करण्यात आली आहे. त्यात बी जी कुलकर्णी, विजयकुमार मुसळे व बापू दळवी यांचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त मंडळांना शासनाने दीडशे मार्गाचे गुणदान केले आहे.

ही समिती परीक्षण करून पोलीस विभागाला अहवाल सादर करणार आहे. जी मंडळे मिरवणुका काढून विसर्जन करणार आहेत त्यांनी शांततेत विसर्जन करावे, कुठलाही अनुचित प्रकार करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक घुगे यांनी केले आहे.

मोहोळ नगरपरिषद प्रशासनाने स्व. मीनाताई ठाकरे उद्यानात कृत्रिम हौद तयार केला आहे. त्या ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र, सार्वजनिक ठिकाणी जेणे करून पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत गणेश विसर्जन करावे असे आवाहन मोहोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ योगेश डोके यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT