New Income Tax System sakal
सोलापूर

Solapur News : नवी प्राप्तिकर प्रणाली ठरेल का फायद्याची, घ्या जाणून

नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकर भरण्याची नवी प्रणाली लागू होणार आहे

सकाळ वृत्तसेवा

नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकर भरण्याची नवी प्रणाली लागू होणार आहे

सोलापूर : प्राप्तिकराच्या नव्या प्रणालीची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षात सुरु होणार आहे. प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्याची जुनी प्रणाली व नवी प्रणाली स्वीकारण्याचा पर्याय मात्र प्रत्येकांसाठी खुला असणार आहे.

जुन्या प्रणालीने दरवर्षी जाहीर झालेल्या उत्पन्न मर्यादेनुसार विवरण पत्रके भरून दिली जात असते. ही जुनी प्रणाली पुढील आर्थिक वर्षात कायम सुरु राहणार आहे. नवीन प्रणाली ही वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामध्ये एकूण उत्पन्नावर टप्प्यानुसार प्राप्तिकराची टक्केवारी निश्चित केली जाणार आहे.

प्राप्तिकदात्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रणालीची निवड करता येणार आहे. तसेच पगारदार व पेन्शनर व्यक्तींच्या पन्नास हजार रुपयाच्या उत्पन्नावर सूट आधी जुन्या प्रणालीप्रमाणे नव्या प्रणालीवर देखील सुरु झाली आहे. नवी प्रणाली ही प्राप्तिकर दात्यांच्या ग्रॉस (एकूण) उत्पन्नावर आधारित असणार आहे. हा बदलाचे परिणाम समजून घेत पुढील काळात प्राप्तिकर पध्दतीचे कायमस्वरूपी बदल स्वीकारले जातील.

नव्या आर्थिक वर्षात प्राप्तिकर भरण्याची नवी प्रणाली लागू होणार आहे. ही ऐच्छिक असली तरी तो दीर्घकाळासाठीचा प्राप्तिकर रचनेतील बदल असू शकतो. त्यामुळे प्राप्तिकर दात्यांनी तो समजून घेत आत्मसात करणे पुढील काळासाठी अधिक चांगले ठरणार आहे.

- ॲड. अक्षय अंदोरे, सचिव,द इन्कम टॅक्स ॲँड सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, सोलापूर

प्राप्तिकर दात्यांना काय करता येईल

- पगारदारांना दरवर्षी रिटर्न भरताना नवी किंवा जुन्या प्रणालीची निवड करता येईल.

- व्यावसायिक व व्यापारी यांना एकदा योजना बदलून पुन्हा पूर्वीच्या योजनेत एकदाच परत येता येईल.

- गुंतवणुकीवरील वजावटीचे पुरावे जुन्या प्रणालीमध्ये भरता येणार आहेत पण नव्या करप्रणालीत असणार नाही.

नवी प्राप्तिकर प्रणाली उत्पन्न मर्यादा व प्राप्तिकराची टक्केवारी

  • ० ते ३ लाख रुपये- प्राप्तिकर नाही

  • ३ ते ६ लाख रुपये- ५ टक्के

  • ६ ते ९ लाख रुपये- १० टक्के

  • ९ ते १२ लाख रुपये- १५ टक्के

  • १२ ते १५ लाख रुपये- २० टक्के

  • १५ लाख व त्यावरील - ३० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election : भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; पुणे महापालिका निवडणुकीत संयुक्त रणनितीची शक्यता!

टी२० वर्ल्ड कपसाठी Shubham Gill ची जागा घेतली आता IPL फ्रँचायझी काढणार वचपा? 'त्या' Video नंतर चर्चा

Sandeep Naik: तिकीट न मिळाल्याने नाराज, पक्ष बदलला; पराभवानंतर संदीप नाईकांचे राजकीय पुनरागमन! राजकारणात खळबळ

Eggs Cause Cancer: अंडी खाल्ल्याने कर्करोग होतो का? FSSAI ने उघड केली वस्तुस्थिती, महत्त्वाची माहिती समोर

Latest Marathi News Live Update : जमिनीचा बेकायदा ताबा घेत खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला अटक

SCROLL FOR NEXT