Ramesh Kadam
Ramesh Kadam Sakal
सोलापूर

सोलापूरमध्ये रमेश कदमांची भूमिका ठरणार निर्णायक? २८ एप्रिलच्या मेळाव्याकडे जिल्ह्याचं लक्ष

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रविवारी (ता. 28 एप्रिल)  मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. माजी आमदार कदम काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

रमेश कदम हे 2014 साली मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले होते. आमदार झाल्यानंतर त्यांनी आठ ते दहा महिने काम केले. त्यावेळी मतदार संघात पाण्याचे दुर्भिक्ष होते, ती अडचण ओळखून त्यांनी मतदार संघात ,मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता, हा उपक्रम राबविला होता.

आठ ते दहा महिने काम केल्यानंतर त्यांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारागृहात जावे लागले. तब्बल सात वर्षे कारागृहात काढल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते कारागृहातच होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी 2019 च्या विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुठलाही ठोस प्रचार न करता त्यांना तब्बल 26 हजार मते मिळाली, यावरून त्यांची मतदार संघातील लोकप्रियता कायम असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात.

जामीन झाल्यानंतर त्यांनी थेट मोहोळ गाठले. मोहोळला आल्यावर त्यांचे ना भुतो  ना भविष्यती असे स्वागत झाले. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. जामिनावर सुटका होताच त्यांना अनेक राजकीय पक्षांनी "आमच्याकडे या" अशी ऑफर दिली.

आता कदम यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांचे जाळे पुन्हा विणले आहे. त्यामुळे येत्या 28 तारखेच्या मेळाव्यात माजी आमदार कदम काय भूमिका घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Faction: अजित पवारांच्या बैठकीला 4 आमदारांची अनुपस्थिती, लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीत अस्वस्थता असल्याची चर्चा

Rahul Gandhi on Stock Market : "खोटे एक्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

IND vs PAK : आमचं हॉटेल बदलून द्या! पीसीबीनं भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी आयसीसीला भरला दम

Latest Marathi News Live Update: मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरून एका माणसाने मारली उडी

Kangana Ranaut: शेतकरी विरोधी वक्तव्य कंगनाला भोवलं, चंदीगड विमानतळावर सुरक्षा रक्षकाने लगावली कानशिलात

SCROLL FOR NEXT