Solapur Lok Sabha Election : सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला; प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज बोराळे मरवडे हुलजंती गावाच्या दौऱ्यात मरवडे येथे त्या बोलत होत्या.
Solapur Lok Sabha  election 2024 Praniti shinde slam bjp Marathi Politics News
Solapur Lok Sabha election 2024 Praniti shinde slam bjp Marathi Politics News

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा केद्रांत राज्यात सलग दहा वर्षे सत्ता असूनही सोलापूर लोकसभेचा उमेदवार दर निवडणुकीला का बदलावा लागतो असा सवाल उमेदवार काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील मरवडे येथे बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज बोराळे मरवडे हुलजंती गावाच्या दौऱ्यात मरवडे येथे त्या बोलत होत्या. शिंदे म्हणाल्या की देशातील अर्थकारण हे शेतकऱ्यांच्या जीवावर असून शेतीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे अस्तित्व संपण्याची काम सत्ताधाऱ्याकडून सुरू आहे, त्यानी महागाई वाढवली, दुधाचा प्रश्न मार्गी लावला नाही, पीक विम्याचे पैसे दिले नाहीत, गुजरातचा कांदा परदेशात पाठवत महाराष्ट्राच्या कांद्याला निर्यात बंदी का? असा सवाल करून अंबानी अदानीसह पाच ठेकेदाराचे हित पाहण्याचे काम सुरू आहे.

पुढील दहा वर्षात काय काम करणार यावर न बोलता जात, धर्म, पात, हे मुद्दे काढून निवडणुकीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्ही मतदारानी या निवडणुकीची एक लढाई माझ्यासाठी करावी पुढची लढाई मी तुमच्यासाठी लढेन असे सांगून मला संधी मिळाल्यास लोकसभेत पहिला आवाज हा शेतकऱ्याचा असेल.

पांडूरंग चौगुले म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली.निवडणूकीच्या तोंडावर मंगळवेढा उपसा सिंचन योजना माण नदीवरील बॅरेज वगळून पाणी मंजुरी गाजर दाखवले. चंद्रशेखर कौडूभैरी म्हणाले,दहा वर्षात दोन खासदारांनी लोकसभेत एकही प्रश्न मारून तडीस नेला नाही. यंदाच्या निवडणुकीत चांगला लोकप्रतिनिधी लोकसभेत जाणे आवश्यक आहे.

Solapur Lok Sabha  election 2024 Praniti shinde slam bjp Marathi Politics News
Akola Lok Sabha Election : अठरा तास उलटूनही मतदानाच्या अंतिम टक्केवारी प्रतिक्षाच; अकोला प्रशासनाचे चाललंय तरी काय?

यावेळी कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, दिलीप जाधव, फिरोज मुलाणी, चंद्रशेखर कौडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रा.येताळा भगत, प्रथमेश पाटील, हणमंत दुधाळ, साहेबराव पवार, पांडुरंग चौगुले, पांडुरंग जावळे, दौलत माने, दादा पवार, साहेबराव पवार, पै.दामोदर घुले, मनोज माळी रविकरण कोळेकर, राजाराम जगताप, तुकाराम भोजने, अजय अदाटे पांडुरंग निराळे बापू अवघडे नाथा ऐवळे सुनीता अवघडे आदीसह काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Solapur Lok Sabha  election 2024 Praniti shinde slam bjp Marathi Politics News
Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com