Lok Sabha Election Sakal
सोलापूर

Lok Sabha Election : साबळे की सातपुते? नुसती चर्चा; बळीराम साठे नारायण पाटलांच्या भेटीला, निंबाळकर भेटणार रणजितसिहांना

सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी कोणाला? आमदार राम सातपुते यांना की माजी खासदार अमर साबळेंना याबद्दल नुसतीच चर्चा झडत आहेत. सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या ढीगभर नावांच्या यादीतून सध्या या दोनच नावांवर चर्चा होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपची उमेदवारी कोणाला? आमदार राम सातपुते यांना की माजी खासदार अमर साबळेंना याबद्दल नुसतीच चर्चा झडत आहेत. सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या ढीगभर नावांच्या यादीतून सध्या या दोनच नावांवर चर्चा होत आहे.

या दोघांपैकी एकाला उमेदवारी येणार नवीन नाव काढून भाजप धक्का देणार? याबद्दल मतदार संघात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सोलापुरातून काँग्रेसची उमेदवारी निश्‍चित मानून आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेस कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.

माढ्यातून भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली असली तरीही या उमेदवारीपेक्षा जास्त चर्चा व उत्सुकता मोहिते-पाटील काय करणार? याबद्दल आहे.

खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीवर मोहिते-पाटील यांच्या परिवारातील एकही सदस्य व्यक्त झालेला नाही. त्यामुळे मोहिते-पाटील काय करणार? याबद्दल उत्सुकता कायम आहे. खासदार निंबाळकर म्हणाले, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे सध्या बाहेरगावी आहेत. ते अकलूजला आल्यानंतर मी स्वत: त्यांच्या भेटीसाठी जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी नुकतीच जेऊर (ता. करमाळा) ग्रामपंचायतीत माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश माने,

मकाईचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब झांजुर्णे, शिवराज जगताप उपस्थित होते. माजी आमदार पाटील यांनी माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवावी, अशी ऑफरच त्यांनी दिली आहे. सोलापुरात भाजपचा उमेदवार कोण? आणि माढ्यात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावर नारायण पाटील म्‍हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वी देखील माझ्याशी संपर्क केला होता. राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी देखील मला राष्ट्रवादीत येण्यासंदर्भात विचारणा केली आहे. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी मला शरद पवारांचा निरोप दिला आहे. याबाबत काय निर्णय घ्यायचा? हे माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील अकलूजमध्ये नसल्याने मी त्यांची भेट घेतली नाही. ते आल्यानंतर मी त्यांच्या भेटीला जाणार आहे.

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विद्यमान खासदार, माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT