suicide esakal
सोलापूर

Solapur News: दहावीचे पेपर अवघड जात असल्याने शाळकरी मुलीची आत्महत्या

मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

श्रीकांत मेलगे

Solapur News : दहावीचे पेपर अवघड जात असल्याने काजल बाळू बनसोडे (वय 16) या शाळकरी मुलीने गळफास लावून घेतलेली घटना मरवडे (ता.मंगळवेढा) येथे रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेने मरवडे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मयत काजल बनसोडे हिचे मामा विलास लक्ष्मण कांबळे (सलगर बु. ता.मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. विलास कांबळे यांच्या बहीण जयश्री बाळू बनसोडे या मरवडे येथे राहत असून त्यांचे पती बाळू बनसोडे यांचे गेल्या सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्यासोबत मुलगा विशाल व मुलगी काजल राहत होते.

काजल ही इयत्ता दहावी मध्ये शिकत होती. दि.02 मार्च पासून सुरुवात झालेले दहावीचे बोर्ड पेपर अवघड जात असल्याचे तिने आपल्या आईकडे सांगितले होते. तिचे अद्यापपर्यंत तीन पेपर झाले होते तर आणखी सहा पेपर होणे बाकी होते. रविवारी दि.13 मार्च रोजी सकाळी आठ वाजता आई जयश्री व भाऊ विशाल हे कामावर गेले होते.

दुपारी एक वाजता कामावरून परत आल्यानंतर काजल हिने घरात पत्र्याच्या छताला असलेल्या अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तिचा गळफास सोडून उपचाराला घेऊन जात असताना ती मयत झाली असल्याचे लक्षात आले.

या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक ईश्वर दुधाळ हे करत आहेत. दहावी शिकणाऱ्या काजल बाळू बनसोडे हिने परीक्षा कालावधी सुरू असताना अभ्यासाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मरवडे परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT