Komal Dhoble Salunkhe 
सोलापूर

Solapur : संघटनेला कोणी चिल्लर समजण्याची चूक कोणी करू नये; अॅड कोमल ढोबळे-साळुंखे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संघटनेचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देऊ

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : तालुक्याच्या राजकारणात ढोबळे गटाची भूमिका निर्णायक आहे मात्र काही मंडळी सध्या गुरुलाच शिकवायला निघाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संघटनेचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करूच पण संघटनेला कोणी चिल्लर समजण्याची चूक कोणी करू नये असा सूचक इशारा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड कोमल ढोबळे-साळुंखे यांनी दिला.

बहुजन रयत परिषदेची विचार विनिमय बैठक मंगळवेढा येथील शिशुविहार येथे पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे,सिद्राम जावीर,राज्य सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर,पश्चिम महाराष्ट्र भगवान गोरखे,सोलापूर शहराध्यक्ष अमित तांबे,डी.राज सर्वगौड,शिवाजी मोटे,सुदर्शन कसबे,दत्तात्रय पाटील,मल्हारी कांबळे,नितीन काळे,प्रकाश खंदारे,जनार्दन अवघडे,सुरेश कांबळे,विशाल खंदारे,विक्रम अवघडे, आदी उपस्थित होते,यावेळी बोलताना अॅड साळुंखे म्हणाल्या की, बाबासाहेबाचे नाव सांगून आपण ज्या समाजातून पुढे येताना पाहतोय.

त्याप्रमाणे आपण वागलो का याचा विचार करण्याची गरज असून न्याय,समता, बंधुता यावर आधारित आपली संविधान सर्वोच्चस्थानी आहे समाजासाठी काम करणारे हात अनेक आहेत मात्र त्या हाताला बळ देणारे हात मात्र कमी आहेत.तालुक्याचा राजकारणाचा संदर्भ गुरुला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगाच्या रंगमंचावर अशा पद्धतीने असावे की आपली भुमिका संपल्यावरही लोकांनी टाळ्या वाजवले पाहिजे अशा पद्धतीचे काम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे असे सांगून लोखंडाचा गंज हा त्याच्या नाशाचे कारण ठरतो त्यामुळे स्वतःमध्ये बदल केला पाहिजे.

राज्याच्या राजकारणातही संघटनेला महत्व आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे संघटना काय काम करते हे शिकवण्याची गरज नाही अशा पद्धतीने आपले अस्तित्व दाखवून द्यावे असे आवाहन करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्याला कोणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही आहोतच असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी तुकाराम गायकवाड (जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद),समाधान वाघमारे (सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख), गोपाळ ऐवळे(तालुका कार्याध्यक्ष),संभाजी भोसले (तालुकाध्यक्ष),सुभाष भंडारे (शहराध्यक्ष) गणपती राठोड (तालुका सचिव),तानाजी अवघडे (शहर उपाध्यक्ष),आदीना निवडीचे पत्र देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT