pre wedding photo shoot esakal
सोलापूर

Solapur : प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी

मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात घेतला ठराव

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री-वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा, असा सूर देखील मान्यवरांच्या भाषणातून निघाला

मराठा सेवा संघप्रणीत मराठा वधू-वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृहात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे-पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवान माने-देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील,

जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा उपाध्यक्ष जी. के. देशमुख, सदाशिव पवार, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे, मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाइस हा वधू-वर मेळावा यशस्वी करण्यासाठी आर.पी. पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, रमेश जाधव, नवनाथ कदम, अभिजंली जाधव,

शोभाताई गुटे, नितीन जाधव, कल्याण गव्हाणे, डॉ. संजिवनी पवार, सचिन चव्हाण, नितीन भोसले, सिद्धाराम वाघ, दीपक शेळके, संतोष जाधव, सचिन शिंदे, सुशिल गवळी, प्रवीण थोरात, गोवर्धन गुंड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी तर आभार दिनकर देशमुख यांनी मानले. वधू-वरांचा परिचय अभिजंली जाधव डॉ. संजीवनी पवार, मनाली जाधव, अनिशा जाधव, वैभवी पवार यांनी करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT