solapur bajar samiti Election  sakal
सोलापूर

सोलापूर बाजार समिती निवडणूक! २१ उमेदवारांच्या हरकतींवर १५ एप्रिलपूर्वी निकाल; पणन संचालक विकास रसाळ यांच्यासमोर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने नामंजूर केले तर १७ जणांचे अर्ज अपात्र ठरत असताना देखील पात्र ठरविले, यावर मंगळवारी (ता. ८) पणन संचालक विकास रसाळ यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावरील अंतिम निकाल १५ एप्रिलपूर्वी अपेक्षित आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चार उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने नामंजूर केले तर १७ जणांचे अर्ज अपात्र ठरत असताना देखील पात्र ठरविले, यावर मंगळवारी (ता. ८) पणन संचालक विकास रसाळ यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावरील अंतिम निकाल १५ एप्रिलपूर्वी अपेक्षित आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. १६ एप्रिलला उमेदवारांची माघार असून १७ एप्रिलला चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दहा दिवस प्रचारासाठी वेळ असून २७ एप्रिल रोजी मतदान तर २८ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. १८ संचालकांसाठी सुमारे ४०० उमेदवारांचे अर्ज आहेत. अर्जाच्या छाननीवेळी १७ जणांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्याची काहींनी हरकत घेतली होती. तर चार अर्ज पात्र असताना अपात्र ठरविल्याची तक्रार होती.

त्यावर मंगळवारी एकत्रित पुण्यातील पणन संचालक कार्यालयात सुनावणी पार पडली. यावेळी हरकतदार, अर्जदारांचे वकील व काही उमेदवारही उपस्थित होते. यावेळी बाजार समितीच्या वतीने ॲड. उमेश मराठे, बाजार समितीचे सचिव श्री. सूर्यवंशी, रजपूत उपस्थित होते. तर जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने सहायक उपनिबंधक आबा गावडे पुण्याला गेले होते. यावेळी जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांना बोलावण्यात आले होते.

युक्तिवाद पूर्ण; पणन संचालकांच्या निर्णयाकडे लक्ष

पणन संचालक विकास रसाळ यांनी सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंजूर, नामंजूर केलेल्या २१ अर्जांवर सुनावणी घेतली. त्यावेळी प्रत्येकाच्या वकिलांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, बाजार समितीच्या वतीने देखील म्हणणे मांडण्यात आले. आता त्यावर सहा ते सात दिवसांत पणन संचालक अंतिम निर्णय देणार आहेत. तो मान्य नसेल तर पुढे काहींनी न्यायालयात जाण्याची देखील तयारी केल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT