Land survey by drone 
सोलापूर

सोलापुर : "मोहोळ तालुक्यात ड्रोन यंत्राव्दारे गावठाण मोजणीस प्रारंभ"

एकूण 73 गावच्या गावठाणाची मोजणी होणार असल्याची माहिती

राजकुमार शहा

मोहोळ : मोहोळ तालुक्यात ड्रोन यंत्राद्वारे गावठाण मोजणीचा आरंभ शुक्रवार ता एक जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून, कुरणवाडी (आष्टी) ता मोहोळ येथून तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या हस्ते करण्यात आला. एकूण 73 गावच्या गावठाणाची मोजणी होणार असल्याची माहिती मोहोळ येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक सुनिता माळी यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना माळी म्हणाल्या, ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोजणी करण्यात येत आहे. यापूर्वी तालुक्यातील 26 गावांची ड्रोन यंत्राद्वारे मोजणी झाली आहे. तालुक्यातील 73 गावांच्या गावठाण मोजणी साठी सुमारे पंधरा दिवस लागणार आहेत. मोहोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सात कर्मचारी यासाठी नियुक्त केले असून, त्यांना गावनिहाय जबाबदारी दिली आहे, तसेच मोजणी संदर्भात त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

यावेळी तहसीलदार बेडसे म्हणाले, या मोजणीमुळे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा व सनद तयार होणार असून मिळकत पत्रिका तयार होणार आहे. घराच्या बांधकामा साठी नकाशा उपलब्ध होणार आहे, बँकांकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया ही सोपी होणार असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरेदी विक्री व्यवहार सुलभ होऊन फसवणूक टळणार आहे. मालकी हक्काचा पुरावा मिळाल्याने आपसातील वाद, तंटा मिटुन गोडी कायम राहणार आहे. गावातील मिळकतींचे क्षेत्र निश्चित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या करातही वाढ होणार आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्ता पवार, सरपंच अमोल जगताप, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, बळीराम मोरे, ग्रामसेवक अनिता वाघमारे, ज्योतिराम कदम, दत्तात्रय तनमोर, दिनकर बावणे, दीपक तांबिले सिद्धेश्वर गिड्डे, मोहोन कोकाटे व भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर गर्दी

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

Raj Thackeray Letter : बाळासाहेब, पवार साहेब, महाजन यांनी कोणालाच पाठीशी घातल नाही; राज ठाकरेंची फडणवीसांवर 'सत्तेचा माज, मौनावर' कठोर शब्दांत टीका

SCROLL FOR NEXT