solapur sakal
सोलापूर

Solapur News : चिंचोली एमआयडीसी हाउसफुल्‍ल; १५१ हेक्टरचे भूसंपादन

पंढरपूर एमआयडीसीचे क्षेत्र औद्योगिक होणार; ‘कुंभारी’ची कार्यवाही जागेवरच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली एमआयडीसीतील उद्योगांच्या जागा हाउसफुल्‍ल झाल्या आहेत. त्यामुळे नवीन मोठ्या उद्योगांसाठी त्याठिकाणी जागा शिल्लक नसल्याने चिंचोली गावाजवळील १५१ हेक्टर जमीन संपादित करण्यासंबंधीचा प्रस्ताव सोलापूर कार्यालयाने उद्योग विभागाकडे पाठविला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हणून चिंचोलीची ओळख आहे. त्याठिकाणी बालाजी अमाईन्स, प्रिसिजन, एलएचपी, पारले-जी यासह अनेक नामवंत कंपन्या उभारल्या आहेत. मोठे अंतर्गत रस्ते, मोकळी जागा, कमी पगारात मनुष्यबळाची उपलब्धता, पाण्याची मुबलक सोय, अशा जमेच्या बाजू त्याठिकाणी असल्याने दिवसेंदिवस उद्योग वाढत आहेत. एक हजार २८ हेक्टर जागांवर सध्या छोटे-मोठे एक हजारांवर उद्योग त्याठिकाणी सुरु आहेत.

एक हजार १६५ प्लॉटपैकी एक हजार २४ प्लॉटवर सद्य:स्थितीत उद्योग उभारलेले असून उर्वरित प्लॉट आकाराने छोटे असल्याने त्याठिकाणी मोठा उद्योग सुरु करता येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. पुण्यातील औद्योगिक वसाहती हाऊसफुल झाल्याने उद्योजकांची सोलापूरला पसंती आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसीत देखील नवीन उद्योगासाठी जागाच शिल्लक नाही. या पार्श्वभूमीवर, चिंचोली एमआयडीसीसाठी आणखी १५१ हेक्टर जागा संपादित केली जाणार असून त्यादृष्टीने सोलापूर एमआयडीसी कार्यालयाचा पाठपुरावा देखील सुरु आहे.

रस्त्यांची कनेक्टिव्हिटी अन् आता विमानसेवेची आशा

सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर- पुणे, सोलापूर- धाराशिव, सोलापूर- विजयपूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर- कोल्हापूर हे महामार्ग तयार झाले आहेत. आता सुरत- चेन्नई महामार्ग प्रस्तावीत असून भविष्यात सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग देखील होणार आहे. मुबलक प्रमाणात मनुष्यबळ येथे उपलब्ध असून आगामी काळात विमानसेवा देखील सुरु होवू शकते. त्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर, उद्योजकांची सोलापूरला पसंती मिळू लागली आहे. त्यातूनच चिंचोली एमआयडीसीची जागा वाढविण्याबरोबरच पंढरपूर व कुंभारी एमआयडीसीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरु आहेत.

चिंचोली एमआयडीसीची स्थिती

एकूण जागा

१०२८.३० हेक्टर

उद्योगांसाठी प्लॉट

१,१६५

उद्योजकांनी घेतलेले प्लॉट

१,०२४

कामगारांची एकूण संख्या

९,७००

नवीन संपादित होणारे क्षेत्र

१५१ हेक्टर

पंढरपूरचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर

पंढरपूर शहराजवळील कासेगाव परिसरात नवीन औद्योगिक विकास महामंडळ सुरु करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. त्यादृष्टीने १ सप्टेंबरला सांगलीच्या विभागीय कार्यालयाने प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. ‘प्रकरण-६’अंतर्गत जागेचे नोटिफिकेशन निघेल आणि त्यानंतर ते क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर होईल. कासेगाव परिसरातील ४१ हेक्टर जीवन संपादित करून त्याठिकाणी उद्योजकांचा अंदाज घेऊ पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कुंभारी एमआयडीसीचा प्रस्ताव मात्र ’जलसंपदा’कडेच पडून आहे. जलसंपदा विभागाने १८ कोटी रुपये माफ करावेत (कॅनॉलजवळ पाइपलाइन), असा प्रस्ताव या खात्याकडेच पडून आहे.

चार वर्षांत ५६ उद्योजकांनी घेतल्या जागा

राज्यातील सत्तासंघर्षाचा फारसा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये जाणवलेला नाही. मागील चार वर्षांत चिंचोली एमआयडीसीत तब्बल ५६ उद्योजकांना जागा मिळाल्या असून त्यातून एक हजारांपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. काही उद्योगांचे बांधकाम सुरु असून ते पूर्ण झाल्यावर त्यातूनही रोजगार उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT