solapur sakal
सोलापूर

Solapur News : मोहोळ तालुक्यात ७५ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध,पिण्याचे पाणी,चाऱ्याचे नियोजन करा- यशवंत माने

ज्या गावात विहिरींची कामे सुरू आहेत ती तातडीने पूर्ण करा व तिथून जलवाहिन्या टाकून त्या गावा पर्यंत पाणी आणा.

राजकुमार शहा

मोहोळ - सध्या पाऊस लांबला आहे, त्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचे योग्य नियोजन करा, शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाय योजना संपल्या तरीही पाणीटंचाई जाणवू लागली तर शेवट पर्याय टँकरचा राहील. या कामात कुणीही हायगय करू नये अशी तंबी आमदार यशवंत माने यांनी आयोजित टंचाई आराखडा बैठकीत अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान तालुक्यात 75 दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे.

मोहोळ तालुक्यातील टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार माने यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आराखडा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. आमदार माने म्हणाले, ज्या गावात विहिरींची कामे सुरू आहेत ती तातडीने पूर्ण करा व तिथून जलवाहिन्या टाकून त्या गावा पर्यंत पाणी आणा.

यावेळी गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांनी तूर्त नसला तर अशीच टंचाई सदृश्य परिस्थिती राहिली तर मात्र जानेवारी पासून टँकर लागतील अशा सूचना केल्या. सध्या तालुक्यातून एका टँकरचा प्रस्ताव दाखला झाला आहे.

नवीन हातपंप, जुने हातपंप दुरुस्ती, विहिरींचे खोलीकरण या सह अन्य उपाय योजना संपल्या तरीही पाणीटंचाई जाणवू लागली तर अधिग्रहण व नंतर टँकर चा शेवट पर्याय असेल. सध्या महसूल विभागाच्या नऊ महसूल मंडळाची सरासरी काढली तर, केवळ 75 दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे तातडीने नियोजन करण्याच्या सूचना आमदार माने यांनी दिल्या.

नवीन आदेश पारित

दरम्यान सध्या गावोगावच्या तलावात पाणी नाही, त्यामुळे त्या ठिकाणी गाळ साचला आहे. गाळात अनेक पोषक तत्वे आहेत. त्या ठिकाणी "गाळपेर" करा व चारा उपलब्ध करावा असा आदेश पारित झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप रणवरे यांनी सांगितले. नियमित वाटपा नुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना मका व हायब्रीड ज्वार शुगर ग्रेज या चाऱ्यांच्या बियाणांचे 15 हजार किलोंचे वाटप केले असल्याचेही डॉ रणवरे यांनी सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वशिम शेख, माजी .पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, यांच्यासह गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT