solapur  sakal
सोलापूर

Solapur News : गणेशोत्सवात ‘डीजे’ला शहरात ‘नो एन्ट्री’

ध्वनी प्रदूषणमुक्तीसाठी पोलिसांचे नियोजन; शहराबाहेर असणार नाकाबंदी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात आवाजाची मर्यादा कोणालाही ओलांडता येणार नाही. त्यातून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, हृदयविकाराचे रुग्ण, यांना त्रास होतो. या पार्श्वभूमीवर, आता आगामी गणेशोत्सव शांततेत व पारंपारिक वाद्यांच्या गजरात आनंदात साजरा करता यावा म्हणून परजिल्ह्यातून शहरात येणारे डीजे पोलिसांकडून नाकाबंदी करून अडविले जाणार आहेत.

लाखो रुपयांचा खर्च करून मोठ्या आवाजाची वाद्ये लावली जातात. आनंदाच्या उत्सवात अनेकांना त्या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हॉस्पिटल, शाळा, रहिवासी परिसराचा कोणताही विचार न करता डीजे लावला जातो. आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ‘डीजेमुक्ती’चा संकल्प करून नवा आदर्श निर्माण करायला हवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, यंदा शहरात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी असण्याची शक्यता असून त्यादृष्टिने नियोजन केले जात आहे. दुसरीकडे आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर देखील गुन्हे दाखल होवू शकतात. त्यामुळे सर्व मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपून विधायक उपक्रम राबवावेत.

महिला, तरुण, लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक एकोपा घट्ट करावा आणि लेझीम, ढोल अशा वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करावे असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मंडळांसह शांतता कमिटीची आज बैठक

१९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवासंदर्भात उद्या (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटी व सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या वतीने डीजेमुक्त गणेशोत्सवासंदर्भात सूचना केल्या जातील. या बैठकीसाठी पोलिसांसमवेत महावितरण व महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर निर्बंध असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. कोणी आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनी प्रदूषण करीत असल्यास आता त्यांच्यावर कारवाई होईलच.

डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT