Ganapati sakal
सोलापूर

Solapur News : जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये यंदा एक गाव एक गणपती

ग्रामीण पोलिसांचा पुढाकार; मिरवणुकांचा खर्च टाळून सामाजिक उपक्रमांवर भर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - गणेशोत्सवाला यंदा १९ सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, जिल्ह्यातील अ, ब, क वर्गातील गावांसह तालुका व उपविभागीय स्तरावर बैठका घेतल्या जाणार आहेत. यावर्षी सुमारे ४०० गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ बसेल असे पोलिसांचे नियोजन आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आता पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे. मोठ्या आवाजाचे वाद्य लावण्याऐवजी टिपरी, लेझीम, झांज, ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा करावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ‘अ’ वर्गातील गावांमध्ये पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व उपअधीक्षक बैठका घेतील.

ब’ वर्गातील गावांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक आणि ‘क’ वर्गातील छोट्या गावांमध्ये बीट अंमलदार बैठका घेऊन नागरिकांना त्यादृष्टीने आवाहन करतील. मागील वर्षी जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी, करमाळा या तालुक्यांमधील २६० गावांमध्ये एक गाव एक गणपती होता.

यंदा ४०० गावांमध्ये एक गाव एक गणपती असणार आहे. दरम्यान, विसर्जन स्थळांचीही पाहणी पोलिसांकडून केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अडचणी असतील, त्याठिकाणी ग्रामपंचायती किंवा नगरपालिकांकडून दुरुस्ती केली जाणार आहे.

एक हजार व्यक्तींवर पोलिसांचा वॉच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या सोलापूर शहरातील २६७ तर ग्रामीण भागातील जवळपास ७०० व्यक्तींवर पोलिसांचा विशेष वॉच असणार आहे. आनंदाचा उत्सव शांततेत साजरा व्हावा हा त्यामागील हेतू असणार आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मोठ्या आवाजाचे वाद्य न लावता पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा, यासाठी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनीही आवाहन केले आहे.

..तर त्या मंडळांवर होणार कारवाई

मोठ्या आवाजाच्या वाद्यांमुळे चिमुकल्यांसह वृद्धांना त्रास सोसावा लागतो. अनेकांचा ह्दविकाराने मृत्यू देखील झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करावा. लाखोंचा खर्च करून मोठ्या आवाजाचे वाद्य लावण्यापेक्षा तोच खर्च सामाजिक उपक्रमांवर खर्च करावा,

असे आवाहन पोलिसांनी केले आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी यावर्षी पोलिसांना नॉईज लेव्हल मशिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. क्षमतेपेक्षा अधिक आवाज असलेल्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT