solapur sakal
सोलापूर

Solapur News : तीन वेळा अपयश,नकारात्मक न होता,विद्याची जिद्दीने यशाला गवसणी

आई-वडील शेती करतात, तर वडील शेती बघत छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेतात.

राजकुमार शहा

मोहोळ - वेगवेगळ्या प्रकारच्या तीन वेळा परीक्षा दिल्या, मात्र नशिबाने जवळ येऊन हुलकावणी दिली. तरी ही नाराज न होता मनात जिद्द बाळगून अखेर चौथ्या टप्प्यात यशाला गवसणी घातलीच. अंकोली ता मोहोळ येथील शेतकरी कुटुंबातील विद्या सिताराम गायकवाड ही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन "वनपरिक्षेत्र अधिकारी" पदी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने तिची निवड झाली तिची ही यशोगाथा. मात्र या यशासाठी आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रेरणा होतीच, पण त्याहीपेक्षा जादा प्रेरणा व प्रोत्साहन चौथ्या टप्प्या पर्यंत मार्गदर्शन केलेल्या प्रत्येक शिक्षकांची मिळाली हे विद्याने आवर्जून सांगितले.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

या संदर्भात माहिती देताना विद्या गायकवाड म्हणाली, मला लहान पणापासूनच प्रशासनातील अधिकारी होण्याची इच्छा होती.मग ते क्षेत्र कुठलेही असो. त्याला कारण ही तसेच होते. घरातील भाऊ व बहीण प्रशासनात चांगल्या हुद्द्यावर नोकरीस आहेत. विद्या चे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या व महाविद्यालयात झाले. तर बारावीचे शिक्षण सोलापूर येथील जोशी महाविद्यालयात झाले. बीएससी ऍग्री ही कृषी क्षेत्रातील पदवी कृषी महाविद्यालय पुणे येथून प्राप्त केली.

17 डिसेंबर 2022 रोजी राजपत्रित तांत्रीकसेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाली. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवेची परीक्षा ही दिली. त्यानंतरचा टप्पा म्हणजे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा.ती एप्रिल 2023 मध्ये दिली.18 डिसेंबरला निकाल झाला, मी महाराष्ट्रातून अकराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे समजल्यावर आनंदाला पारावर उरला नाही. घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना झाली.

आई-वडील शेती करतात, तर वडील शेती बघत छोटे मोठे बांधकामाचे ठेके घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या अडचणीची मला जाण आहे, मी ग्रामीण भागातीलच आहे, त्यामुळे प्रशासनात चांगला अधिकारी म्हणून सर्वसामान्याला जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे विद्या गायकवाड हिने सांगितले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Dussehra Melava 2025 Live Update: कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात

परंपरा मोडायला घाबरत नाही... 'त्या' कारणामुळे दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेत

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

SCROLL FOR NEXT