परिचारिका
परिचारिका sakal
सोलापूर

सोलापूर : परिचारिका ठरल्या जागतिक महामारीतील खऱ्या लढवय्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनासारख्या महाभयंकर जागतिक महामारीतही रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, नागरिकांकडून उपेक्षा, उपलब्ध सुविधा आणि बऱ्याचवेळा परिचारिकांना रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी शिवीगाळ, मारझोड अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत केलेल्या सेवेमुळे परिचारिका या खऱ्या लढवय्या ठरल्या.

परिचारिका म्हणून नोकरी बजाविताना त्यांच्या न्याय्य हक्कासाठी तर लढा चालूच आहे; परंतु कोरोनासारख्या जागतिक महामारीत मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि पारिवारिक असे चार ढाल घेऊन परिचारिका लढल्या.मृत्यू समोर दिसत असतानादेखील ‘रुग्णसेवे’च्या कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या राज्यातील आठ हजार परिचारिकांचे कोरोना काळातील योगदान हे कायम स्मरणात राहणारे आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची नोकरी कष्टमय आहे. कमी सुविधा, कमी वेतनामध्ये रुग्णसेवा म्हणून कर्तव्य बजाविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अपघात अथवा इतर दुर्घटना घडल्यानंतर अनेकवेळा तातडीची सेवा बजाविणे हे बंधनकारक असते. वेळ, काळ, जॉबचार्ट, परिवार अशा बऱ्याच नियमांच्या पलीकडे जाऊन रुग्णसेवेसाठी

आम्ही लढवय्ये...

राजर्षी शाहू महाराज हे एक लढवय्ये व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी विविध सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाययोजनांची सुरवात आपल्या कोल्हापूर संस्थानातून केली. शिक्षण, शेती, आरक्षण, धरण बांधणी, कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आश्रय देणारे प्रभावी राजे अशीही त्यांची ओळख. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी लढा देणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांच्या कार्याचा आढावा ‘आम्ही लढवय्ये’ म्हणून घेत आहोत.

दवाखान्यामध्ये केले सण-उत्सव साजरे

परिचारिकांनी कोरोनामध्ये रुग्णांचे वाढदिवस, अनेक सण-उत्सव देखील दवाखान्यात साजरे केले. अशा आपत्कालीन परिस्थितीत उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी, परिचारिकांच्या न्याय्य हक्कासाठी राज्य परिचारिका संघटनेचा लढा कायम राहणार असल्याचे राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मनीषा शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT