Solapur Police Bharti  sakal
सोलापूर

Solapur Police Bharti : एक हजार ४३९ पैकी १२३६ उमेदवार पात्र

शहर पोलिस दलातर्फे ३२ पोलिस शिपाई व १६ चालक शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी पार पडली. या भरतीसाठी दोन हजार ३३० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक हजार ४३९ उमेदवार मैदानासाठी हजर राहिले होते. त्यातील एक हजार २३६ उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिस दलातर्फे ३२ पोलिस शिपाई व १६ चालक शिपाई पदांसाठी मैदानी चाचणी पार पडली. या भरतीसाठी दोन हजार ३३० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक हजार ४३९ उमेदवार मैदानासाठी हजर राहिले होते. त्यातील एक हजार २३६ उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले. त्यातील उमेदवारांची आता लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी एकूण २०३ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

शहर पोलिस दलाची मैदानी चाचणी आता पूर्ण झाली आहे. पण, शासकीय नोकरीसाठी इतर घटकांमध्ये हजर राहिला असेल तेथील हजेरी नोंदीचा पुरावा सादर करून २५ जून रोजी सकाळी सहा वाजता पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीसाठी हजर राहू शकतात, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. ग्रामीण पोलिसांची भरती २७ जूनपर्यंत चालणार आहे.

उद्या (ता. २२) ग्रामीण पोलिसांनी ७५० उमेदवारांना बोलावले आहे. राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा यांच्या वतीने आज ८०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यातील १९३ जण गैरहजर राहिले तर ९९ उमेदवार अपात्र ठरले. ५०८ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT