सोलापूर

Solapur: खा.शिंदेंनी स्टंटबाजी सोडून कामाला लागावे, समाधान आवताडेंनी केली टिका

Maharashtra:

हुकूम मुलाणी ​

Mangalvedha: तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात किती मताधिक्य मिळाले याचे आत्मपरीक्षण करून निवडणूक निकालानंतर करत असलेली स्टंटबाजी सोडा आणि कामाला लागा असा खोचक टोला आ. समाधान आवताडे यांनी लगावला.

तालुक्यातील कात्राळ येथे त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या व काम पूर्ण झालेल्या विकास कामाच्या उद्घाटन समारंभा नंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, विजय माने, सरोज काझी, तानाजी काकडे,राजन पाटील, जगन्नाथ रेवे, शिवाजी पटाप नंदू जाधव पप्पू काकेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की, लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या मतदार संघात मराठा आरक्षण, कांद्याचा प्रश्न, दुध दराचा प्रश्न,संविधाना विषय आधी प्रश्नावरून चर्चा होती मात्र लोकसभा निवडणुक विकासाच्या मुद्द्यावर न होता एका विशिष्ट समाजावर गेली. आणि ते समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मते देखील मिळाले नाही. या निवडणुकीदरम्यान खोटा नोटा प्रचार देखील करण्यात आला.

त्यामुळे आम्हाला 45 हजार कमी मते मिळाली मतदारानी दिलेला कौल मान्य करतो मात्र विजयी झालेल्या खा. प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांनी तीन टर्म ज्या मतदारसंघातून काम केले त्या मतदारसंघात कमी मते का मिळाली. याचा आत्मपरीक्षण देखील करावं. असे सांगून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मताधिक्यावर भगीरथ भालके यांचे नाव न घेता घरात बसून घरात कुठे लीड मिळत असतं का ? असा खोचक टिपणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

दोन दिवसांपूर्वी खा. प्रणिती शिंदे यांनी आंधळगाव,लक्ष्मी दहीवडी,मारापूर या गावाच्या गावभेट दौऱ्यात अधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आ. अवताडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता मात्र यावर आ.अवताडे यांनी सडेतोड उत्तर दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT