solapur  sakal
सोलापूर

Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ पुरवणी परीक्षा लांबणीवर, नोव्हेंबरमध्ये सत्र परीक्षा

स्पेशल ड्राईव्हनंतरही निकाल अपूर्णच; प्राध्यापक व्यस्त, पेपर तपासणीत अडचणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा परीक्षा विभाग नेहमीच परीक्षेच्या निकालावरून चर्चेत राहिले आहे. आता सत्र परीक्षा होऊन ४० दिवस झाले, तरीदेखील सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.

त्यामुळे पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होऊ शकलेले नाही. दुसरीकडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सत्र परीक्षेला सुरवात होणार आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे.

सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याचे विद्यापीठाकडून नियोजन केले जात आहे. पण, सण-उत्सवांमुळे परीक्षा नेमकी कधी घ्यायची, यावर अजून शिक्कामोर्तब झालेले नाही. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिली सत्र परीक्षा होणार आहे.

दरम्यान, आता प्रलंबित निकाल आणि पुरवणी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत म्हणून प्राध्यापकांना अध्यापनासोबतच पेपर तपासणीचे काम करावे लागत आहे. स्पेशल ड्राईव्हमुळे अध्यापनास अडचणी येत असून अभ्यासक्रम अपूर्ण राहत असल्याचे गाऱ्हाणे मांडूनही विद्यापीठ स्पेशल ड्राईव्हवर ठाम आहे.

परीक्षेनंतर साधारणतः: ३० दिवसांत निकाल जाहीर होणे क्रमप्राप्त आहे, पण ४५ दिवसानंतर त्याचे उत्तर राज्यपालांना द्यावे लागते. ही वेळ येवू नये म्हणून परीक्षा विभागाची धडपड सुरु आहे. पण, निकालास एवढा विलंब का लागला, याचे ठोस उत्तर विद्यापीठाकडे नाही हे विशेष.

अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसीच्या निकालास विलंब

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे निकाल वेळेत जाहीर व्हावेत, यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे यांचे स्पेशल ड्राईव्हच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. पण, स्पेशल ड्राईव्हनंतरही अभियांत्रिकी, एमबीए व फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे निकाल पूर्णता: जाहीर होणार नाहीत,

ही वस्तुस्थिती आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के निकाल लागले असून अद्याप २० टक्के निकाल बाकी आहेत. निकाल १०० टक्के जाहीर झाल्याशिवाय पुरवणी परीक्षा शक्य नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संगणक कंपनी म्हणते, कर्मचाऱ्यांना हवीय सुटी

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे काम करणाऱ्या संगणक कंपनीचे कर्मचारी चार महिन्यांपासून विद्यापीठाकडेच आहेत. आता पुरवणी परीक्षेसाठी अंदाजे पाच हजार विद्यार्थी असून त्यांचे परीक्षा फॉर्म व हॉलतिकीट तयार करून देण्याची विनंती विद्यापीठाने त्यांच्याकडे केली आहे.

पण, सण-उत्सवात आमच्या कर्मचाऱ्यांना चार दिवसांची सुट्टी हवी आहे असे संगणक कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षा ऑक्टोबरमध्येच होईल, अशी सद्य:स्थिती आहे. तरीदेखील विद्यापीठाने संबंधित कंपनीकडे अंतिम मत मागविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT