रस्‍ता दुरुस्‍ती
रस्‍ता दुरुस्‍ती sakal
सोलापूर

सोलापूर : रस्‍ता दुरुस्‍तीला मिळेना मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा

पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली पंढरपूर येथील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असणाऱ्या पटवर्धन कुरोली ते भोसे या रस्त्याच्या कामाला यंदा तरी मुहूर्त लागणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ व प्रवाशांतून केला जात आहे. रस्ता न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याची चर्चा ग्रामस्थांतून होत आहे.

भोसे ते पटवर्धन कुरोली हा अकरा किलोमीटर रस्ता आहे. भोसेपासून शेवतेपर्यंत चार किलोमीटरचे काम झाले आहे. परंतु शेवतेपासून पटवर्धन कुरोली या रस्त्याचे काम गेल्या अकरा वर्षापासून रखडले आहे. प्रत्येकवर्षी फक्त खड्डे बुजवुले जातात. परंतु तेही ठेकेदाराकडून व्यवस्थित बुजविले जात नाहीत. या मार्गावरून जाताना रस्त्यावर खड्डा आहे कि, खड्ड्यात रस्ता आहे हेच वाहनधारकांना समजत नाही. त्यामुळे ठेकेदाराला सुध्दा किती खड्डे बुजवावेत असा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी दीड ते दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी खडी उघडल्‍याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

याच खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात शेवते (ता.पंढरपूर) येथील एक व्यक्तीचा बळी गेला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असूनही प्रशासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत आहेत. या मार्गावरून भोसे येथे दररोज शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात. तर शेवते तसेच पटवर्धन कुरोलीच्या वाडीवस्तीवरील मुले याच रस्त्याने पटवर्धन कुरोली येथे शाळेला येतात. तसेच पंढरपूर आगारातून आव्हे, पटवर्धन कुरोलीला असणारी बससेवा याच मार्गाने आहे. आव्हे, नांदोरे, तरटगावभोसेसह आठ ते दहा गावांचा दैनंदिन दळणवळणाचा रस्ता आहे.

रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच या रस्त्यावर लहान मोठे अपघात नित्यनियमाने होत आहेत. अजून कितीजणांचा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहणार असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून या रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. अन्यथा येणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालू, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT