rupees 2000 note sakal
सोलापूर

Rupees 2000 Note : ‘ती दिसलीच नाही; तर बदलण्यासाठी आणायची कुठून’?

‘ती दिसलीच नाही तर बदलण्यासाठी आणायची कुठून’? या सारख्या मीम्समधून दोन हजार रुपयांच्या नोट बदलाचे आदेश निघाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार कॉमेंट्स करत नोटबंदीच्या निर्णयाची चांगलीच खिल्ली उडविली आहे.

प्रशांत पाटील

सोलापूर, - ‘ती दिसलीच नाही तर बदलण्यासाठी आणायची कुठून’? या सारख्या मीम्समधून दोन हजार रुपयांच्या नोट बदलाचे आदेश निघाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार कॉमेंट्स करत नोटबंदीच्या निर्णयाची चांगलीच खिल्ली उडविली आहे.

भारतीय रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटा बदलण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार, नोट धारकांनी त्यांच्या नोटा बॅंक खात्यात ३० सप्टेंबर पर्यंत जमा करायच्या आहेत. एरवी समाज माध्यमामध्ये कोणताही सरकारी निर्णय आला की, त्याचे समर्थक व विरोधक यांच्यातील प्रतिक्रियांची गर्दी होते. पण यावेळी दोन हजाराच्या नोटबंदीवर नेटकऱ्यांनी समर्थन व विरोध सोडून या निर्णयाचीच खिल्ली उडविल्याचे दिसत आहे.

मुळातच दोन हजाराच्या नोटाच अत्यंत कमी प्रमाणात वापरामध्ये आहेत. एकूण उपलब्ध नोटांपैकी केवळ १०. ८ टक्के नोटा चलनात वापरल्या जात आहेत असे रिझर्व बॅंकेचे म्हणणे आहे. तेव्हा यावर एका मीम्समध्ये दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी, आणायच्या कुठून असा प्रश्न विचारला आहे.

‘ती होती पण ती दिसली नाही तर बदलण्याचा प्रश्न कुठे, असा प्रश्न विचारला आहे.

‘माणसाचे आगमन खाटावर

माणसाचे मध्यंतर पाटावर

माणसाचा शेवट घाटावर

तरी पण चित्त सारे नोटावर’

या शब्दात नोटांच्या मुद्द्यावर मानवी वृत्तीचे दर्शन काहींनी मांडले.

‘नांदवायची नव्हती

मग मला आणली कशाला,

आपली दोन हजाराची नोट, या शब्दात नोटेचे मनोगत व्यक्त केले.

‘दोन हजाराची नोट बंद होणे म्हणजे रोल्स रॉयल्सचे मॉडेल बंद होण्यासारखे आहे’

‘आपल्याला काही देण घेणे नाही कोणाकडे होती याची पण माहिती नाही’ या सारखे मीम्स धमाल उडवत आहेत.

एका नेटकऱ्याने सुंदर शब्दात वर्णन केले. ‘एक जुनी मैत्रीण होती, ती पूर्वी फार भेटायची, नंतर भेटी कमी झाल्या,

आजकाल ती दिसत देखील नाही अशी ती दोन हजाराची नोट’ या शब्दात या नोटेचे वर्णन केले आहे.

एकंदरीत, नेटकऱ्यांना दोन हजाराची नोट भलतीच आवडली आहे. नोट नाही असे म्हणताना सामान्य माणूस त्याचे कारण सिलिंडर कडे बोट दाखवतो हे व्यंगचित्र देखील व्हायरल झाले. एकदंरीत ही नोटबंदी तशी गर्दी, रांगा, गोंधळापासून दूर असल्याने त्याचा आनंद विनोदी पद्धतीने नेटकरी अधिक घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT