solapur
solapur sakal
सोलापूर

धक्कादायक! तरुणाने मावा खाल्ला अन् चक्कर आली; काही कळायच्या आतच...

चंद्रकांत देवकते

मोहोळ : एका तरुणाचा मावा खाल्ल्याने तो चक्कर येऊन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना मोहोळ सोलापूर रस्त्यावरील हॉटेल चैतन्य समोर सकाळी 7 .45 वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरापूर येथील खंदारे वस्ती परिसरात अविनाश पोपट खंदारे हा तरुण गॅस गाडीवर तो चालक म्हणून काम करतो. ता.25 ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान तो नेहमीप्रमाणे गॅस गाडीवर कामाला जाण्यासाठी स्वतःच्या दुचाकी वरून पोखरापूर येथून मोहोळ येथे आला.

त्यानंतर एक तासानंतर त्याच्या मोबाईल वरून चुलते महावीर नामदेव खंदारे यांना एका व्यक्तीने फोन करून अविनाश याला चक्कर आल्याचे सांगितले. त्यावेळी महावीर खंदारे हे इतर नातेवाईकांसमवेत लागलीच चैतन्य हॉटेल समोर गेले असता, अविनाश पडलेला होता.

त्याला त्यांनी उठवले व चौकशी केली असता त्याने मावा खाल्ल्याने चक्कर आली आहे, असे सांगितल्याने त्यांनी त्याला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात महावीर खंदारे यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT