asara pul.jpeg
asara pul.jpeg 
सोलापूर

सोलापूर जलमय : भर पावसात वाहतूक पोलिस बुजवतात खड्डे 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी 12 वाजेपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे होटगी रोड परिसरतील सहारानगर, कल्याणनगर परिसरातील सखलभागातील अनेक घरात पाणी घुसले आहे. या अरुंद पुलावर विजयपूर महामार्गाची संपूर्ण वाहतूक वळवल्याने कल्याणनगर परिसरातील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. बुधवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी भर पावसात या भागातील खड्डे बुजवण्यास सुरवात केली. 
भर पावसात रस्ता रोको 
बुधवारी सकाळी आसरापुलावर भर पावसात रस्ता रोको केला. धर्मवीर संभाजी राजे तलावाशेजारील रेल्वे उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या ड्रिनेजच्या कामामुळे या विजयपूर महामार्ग 6 ऑक्‍टोबरपासून बंद आहे. यामुळे यामार्गावरून होणारी वाहतूक वळवल्याने या भागात रहिवाशांना घराबाहेर पडणेही मुश्‍किल झाले आहे. अशात सोमवार पासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पुलावरील बुजवलेले सर्व खड्डे पुन्हा उखडले आहेत. बुधवारी सकाळी वाहतूक पोलिसांनी भर पावसात या भागातील खड्डे बुजवण्यास सुरवात केली. 

अरुंद पुलामुळे समस्या 

आसरा पूल हा केवळ वीस वर्षांपूर्वी बांधलेला असून पुढील वाढत्या लोकसंख्येचा व वाढत्या वाहन संख्येचा यावेळी विचार केलेला नसल्याने हा पूल अरुंद व कमकुवत आहे. या पुलावरून विजयपूर महामार्गावरील जड वाहने वळविल्याने पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक पटीने वाहतूक पुलावरून सुरू आहे. या पुलावर अनेकदा वाहने बंद पडली तर एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू ठेवण्याशिवास पर्याय राहत नाही. बुधवारी सकाळी 11 वा. या पुलावर एसटी बस बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. 

सिद्धेश्‍वर मंदिराचा सभामंडप जलमय 

सोलापूर शहर जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साठले. 
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात आणि सभामंडपात काल रात्रीपासून झालेल्या पावसाने परिसर जलमय झाल्याचे दिसून आले. सोलापूर शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे बुधवार पेठ परिसर सम्राट चौक महेश कॉलनी जय मल्हार चौक जुना कारंबा नाका शेळगी नाला पूल पाणी वाहत असल्यामुळे अठरा नगर अठरा नगराचा संपर्क तुटला आहे. 

संपादन : अरविंद मोटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT