Solapur Weather Update heat waver Sudden cold weather affects health
Solapur Weather Update heat waver Sudden cold weather affects health esakal
सोलापूर

Solapur Weather Update : सोलापुरात वाढू लागला उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मकर संक्रांतीला उन्हाचा चटका वाढण्यास सुरवात होत असल्याचा सोलापूरचा अनुभव आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर व परिसराच्या तापमानात वाढ होताना दिसत आहे. सोलापूरच्या कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागला आहे. रात्री व पहाटेच्या सुमारास अद्यापही वातावरणात थंडी जाणवत आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री पडणारा गारवा यामुळे आरोग्याच्या समस्या उदभवू लागल्या आहेत.

आज सोलापूर शहर व परिसरात ३७.२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. १४ व १३ फेब्रुवारीला सोलापूरच्या कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे होता. फेब्रुवारी संपण्यापूर्वीच तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागल्याने यंदाच्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा चटका फेब्रुवारीनंतर वाढत असल्याचा आजपर्यंत अनुभव आहे. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याच्याही नोंदी आहेत. उन्हाचा चटका वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT