PPE kits.jpg
PPE kits.jpg 
सोलापूर

सोलापूरकरांनी केली पंचवीस हजार पीपीई किटसची निर्मिती

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः कोरोना संकटात सोलापूर शहर व जिल्हा रेडझोन असताना येथील उद्योजकांनी 25 हजारांपेक्षा अधिक पीपीई किट्‌सची निर्मिती करून कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना मोठी मदत केली. अंदाजे आठ ते 10 लाख मास्कची निर्मिती या उद्योगांनी केली आहे. कोरोना युद्धात अनेक संकटे असताना सोलापूरच्या उद्योजकांनी ही कामगिरी केली आहे. 

हेही वाचाः चार गावातील विद्यार्थी व पालकांना सूर्यग्रहण दाखवण्याचा प्रयोग 

सोलापूरच्या उद्योजकांसमोर अनेक आव्हाने कोरोना संकटाने उभी केली होती. कारखान्यात अधिक संख्येने असलेले परप्रांतीय कामगार त्याच्या मूळ राज्यात निघून गेले. कामगाराचा सर्वत्र तुटवडा होता. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा जास्त संसर्ग होता. सोलापुरी चादर व टॉवेल निर्मितीचे काम विस्कळित झाले होते. 
मात्र, काही उद्योजकांनी कोरोना उपचारास आवश्‍यक पीपीई किट्‌स निर्मितीचे काम सुरू केले. मागील काही महिन्यांत किटसला जास्त मागणी होती. त्यासाठी आवश्‍यक कच्चा माल उपलब्ध झाल्यानंतर पाच उद्योजकांनी युद्धपातळीवर त्याची निर्मिती केली. शासन व वैद्यकीय यंत्रणांना अपेक्षित उच्चतम दर्जाचे किट्‌स तयार केले. दररोज 250 ते 300 किट्‌सची निर्मिती करत होते. 

हेही वाचाः अशी मानवसेवा, रुग्णसेवा पाहिली का कुठे? वाचा सविस्तर 

कोरोना उपचारात तातडीची गरज असल्याने रेल्वे व अन्य वाहतूक यंत्रणांची मदत घेण्यात आली. या किट्‌ससोबत आवश्‍यक ग्लोव्हज व मास्क तयार करण्यात आले. महाराष्ट्राबाहेर अनेक मोठ्या शहरात कोरोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना किट्‌स उपयोगी पडले. 
गारमेंट निर्मात्यांनी मास्कची निर्मिती केली. अनेक उद्योजकांनी झपाट्याने त्यांचे मास्क उत्पादन वाढवून स्थानिक नागरिकांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न केला. तसेच बाहेरगावी मास्कची विक्री झाली. अंदाजे आठ लाख मास्कची निर्मिती करण्यात आली. केवळ एन 95 मास्कसाठी आवश्‍यक कच्चा माल मात्र उद्योजकांना मिळाला नाही. त्यामुळे त्याची निर्मिती करता आली नाही. 
साखर कारखान्यांनी देखील शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लिटर सॅनिटायझरची निर्मीती केली. स्थानिक बाजारपेठेशिवाय इतर ठिकाणी ही उत्पादने पाठवण्यात आली. 

आरोग्य सेवेची मदत मोठी 
सोलापुरातील उद्योजकांनी उत्तम पध्दतीने पीपीई किटस पुरवण्याचे काम केले. अत्यंत महत्वाच्या वेळी रुग्णालयांची ही गरज भागवण्याचे काम झाले. तसेच सर्व सामान्यासाठी लाखो मास्कची निर्मिती देखील उपयुक्त ठरली. 
- राजेश कोचर, उद्योजक सोलापूर  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Team India Jersey: टीम इंडियाची T20 जर्सी जेठालालसारखी! सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस, भन्नाट मीम्स व्हायरल

BJP Manifesto : विकसित पुणे घडविणारे ‘संकल्पपत्र’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

SCROLL FOR NEXT