covid vaccine covid vaccine
सोलापूर

लस न घेतलेले काहीजण म्हणतात..! मी मटन, अंडी खातो, मद्यपान करतो

कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचल्यानंतर संबंधित रुग्णाचे मृत्यू झालेले नाहीत

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे(Corona Vaccine) दोन्ही डोस टोचल्यानंतर संबंधित रुग्णाचे मृत्यू झालेले नाहीत. जिल्ह्यातील 15 वर्षांवरील 36 लाख 40 हजार 812 जणांनी प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित असूनही अद्याप सात लाख 46 हजार 255 व्यक्‍तींनी लस टोचलीच नाही. चिंतेची बाब म्हणजे लस न टोचणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय असून मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर आणि मोहोळ हे तालुके पिछाडीवर आहेत. अक्‍कलकोट तालुक्‍यातील सर्वच व्यक्‍ती लसवंत (Vaccinated)झाले आहेत. अनेकजण गैरसमजुतीतून लस टोचून घेत नसल्याची स्थिती आहे.

सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना, वाहनात इंधन भरताना, किरणा दुकानातून वस्तू घेताना, मॉलमध्ये जाताना प्रत्येकांकडे लसीचे दोन्ही डोस टोचलेले प्रमाणपत्र असावे, असे बंधन जिल्हा प्रशासनाने घातले. मात्र, त्या निर्णयाला काहींनी विरोध केला आणि ती अट शिथिल झाली. लस टोचण्याचा निर्णय ऐच्छिक आहे, परंतु प्रत्येकांनी स्वत:बरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधित लस टोचण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले. तरीही, गैरसमजुतीतून लस न टोचणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

लस न टोचणाऱ्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील पाच लाख तर 15 ते 17 वयोगटातील सव्वादोन लाख आणि 60 वर्षांवरील 29 हजार व्यक्‍तींचा समावेश आहे. शहरातील एक लाख 12 हजार व्यक्‍तींनीही लस घेतलेली नाही. उत्तर सोलापुरातील 11 हजार 392, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 13 हजार 20, मोहोळ तालुक्‍यातील 40 हजार 717, मंगळवेढ्यातील 34 हजार 679, सांगोल्यातील 49 हजार 527, माढ्यातील 37 हजार 863, करमाळ्यातील 38 हजार 93, माळशिरस तालुक्‍यातील 81 हजार 348, बार्शीतील 47 हजार 472 आणि पंढरपूर तालुक्‍यातील एक लाख 12 हजार 351 व्यक्‍तींनी अजूनपर्यंत लस घेतलेली नाही. मांसाहार व मद्यपान केल्याने कोरोना होत नाही, अशा गैरसमजातून लस न घेणाऱ्यांच्या बाबतीत जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करणार, याची उत्सुकता आहे.(Solapur News)

लस न टोचणाऱ्यांच्या पोकळ गप्पा...

- मला काहीच होणार नाही, मी मद्यपान करतो

- मी दररोज जेवणात मटन, अंडी खातो

- दोन्ही लाटांमध्ये काय झाले नाही अन्‌ आता काय होणार

- कोरोना नाहीच, भीतीने लोकांचा झाला मृत्यू

- मी दररोज गरम पाणी पितो, काढाही घेतो

- प्रतिबंधित लस घेऊनही कोरोना होतोच की, मग लस घेऊन काय फायदा

- आम्ही आतापर्यंत कधीच दवाखान्यात गेलो नाही, कोणतीही लस टोचून घेतली नाही

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, तरीही रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. परंतु, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा तो सकारात्मक परिणाम आहे. सर्वांनी लस टोचून सुरक्षित व्हावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून आता लसीकरण 100 टक्‍के करण्याचे नियोजन केले आहे.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT