sonpati sutar Pakshi in Solapur  
सोलापूर

सोलापूरच्या सिद्धेश्‍वर वनविहारात आढळला सोनपाठी सुतार पक्षी 

अरविंद मोटे

सोलापूर : विजापूर रोड येथील सिद्धेश्वर वनविहार परिसरात नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे सदस्य निसर्ग भ्रमंतीसाठी गेले होते. सकाळी 7 च्या दरम्यान वनविहारातून चालत जाताना त्यांना करकर असा आवाज कानी पडला आजूबाजूला पहिले तर एका झाडाच्या बुंध्यावर एक सुतार पक्षी आपल्या चोच मारून झाडांवरील किटक शोधत होता. कॅमेऱ्याच्या साह्याने झूम करून पाहिले तर हा आपल्याकडे सामान्यपणे आढळणारा मराठा सुतार नसून वेगळा सुतार पक्षी दिसून आले. लगेच नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे कार्याध्यक्ष भरत छेडा यांना त्या पक्षाचे फोटो पाठवून दिले असता त्यांनी यांनी तो पक्षी सोनपाठी सुतार असल्याचे सांगितले. 

सोनपाठी सुतार हा साधारण 30 सें. मी. आकारमानाचा पक्षी असून याच्या पाठीच्या सोनेरी रंगावरून याचे नाव सोनपाठी सुतार असे पडले आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आहेत. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पत्नी तेहमिना यांचे नाव सोनपाठी सुताराच्या एका उपजातीला (Dinopium benghalense tehminae) दिले आहे. 

नर सोनपाठी सुताराच्या पाठीचा रंग सोनेरी पिवळा, माथा व तुरा लाल, डोळ्याजवळ काळे- पांढरे पट्टे, फिकट पांढऱ्या रंगाचे पोट व गळ्यापासून पोटाच्या मध्य भागापर्यंत काळे-पांढरे ठिपके असतात. त्याची शेपटी काळ्या रंगाची असते. मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिके असतात. सोनपाठी सुतार भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका (येथे दोन उपजाती), म्यानमार (येथे तीन उपजाती) या देशांमध्येही आढळतो. 

सोनपाठी सुतार विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो. झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिद्र पाडतो. कीटकांशिवाय मध आणि पिकलेली फळेही सोनपाठी सुताराला आवडतात. हा उडतांना बहुतेक वेळा कर्कश आवाजात ओरडतो आणि यावरून सोनपाठी सुताराला जंगलात सहजपणे शोधता येते. मार्च ते ऑगस्ट हा सोनपाठी सुताराचा वीणीचा हंगाम असून याचे घरटे जमिनीपासून दोन ते 10 मी. उंच झाडाच्या ढोलीत असते. मादी एकावेळी दोन ते तीन चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते. सोनपाठी सुतार नर आणि मादी मिळून पिलांची देखभाल करतात. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira Bhayandar Morcha : 'परप्रांतीयांनी मोर्चा काढला, त्यांचा हेतू वाईट नव्हता, पण मनसेचा..'; आमदार मेहतांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता!

Latest Maharashtra News Updates : "लाज असल्यास मंत्रीपदाचा राजीनामा द्या" - राजन विचारे

Pimple Gurav News : निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे ‘दृष्टीहीन’ देखभालीचा अभाव; सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागरमधील सुरक्षा ऐरणीवर

Yash Dayal: यश दयालच्या विरोधात FIR दाखल, होऊ शकते १० वर्षांची शिक्षा! तक्रार करणाऱ्या महिलेने पुरावेही केले सादर

Kolhapur Accident : साहिलवर होती कुटुंबाची जबाबदारी, कुरिअर सेवेनंतर विकायचा बिर्याणी; पार्सल देऊन लवकर येतो म्हणून गेला अन्...

SCROLL FOR NEXT