Maratha Kranti Morcha Canva
सोलापूर

"पूर्वग्रह बाळगून मराठा समाजाला सापत्न वागणूक ! सरकारला परिणाम भोगावे लागतील'

मराठा समाजावर अन्याय झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : आज मराठा आरक्षणावर (Maratha Community reservation) गेली 40-42 वर्षे सुरू असलेले संविधानात्मक आंदोलन (Constitutional movement) स्व. अण्णासाहेब पाटील, स्व. अण्णासाहेब जावळे- पाटील या मराठा समाजपुरुषांच्या बलिदानासोबत 42 समाजातील कार्यकर्त्यांचे हौत्यात्म्य, बायाबापड्यांसह समाजाने आंदोलनाच्या इतिहासातील न भूतो असे शांततामय मार्गाने काढलेले लाखोंचे अठ्ठावन्न मोर्चे या धीरगंभीर सहनशीलतेचा घोर अवमान झाला असून, भविष्यात सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे (Mahesh Dongare) यांनी दिला आहे. (State Coordinator of Maratha Kranti Morcha Mahesh Dongre said that injustice has been done to the Maratha community)

पुढे बोलताना डोंगरे म्हणाले, पुन्हा एकदा महाराष्ट्रावर दिल्लीने अन्याय केला. कुणावरही राजकीय टीका- टिपण्णी करण्याची इच्छा नाही; मात्र समाज म्हणून या निर्णयाकडे राजकीय तटस्थतेने पाहात असतानाही या निकालाला राजकारणाचा उग्र दर्प येतो आहे. अगदीच स्पष्ट सांगायचे झाले तर, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारताना पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, हा प्रमुख युक्तिवाद ग्राह्य धरून निकाल दिल्याचे प्रथमदर्शनी दिसते. आणि इथेच या निर्णयावर संशय घेण्यास फट मिळते.

महाराष्ट्रासह सर्वच राज्यांनी मराठा आरक्षणाआधी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. जातिनिहाय 52 टक्के, त्यात केंद्र शासनाचे 10 टक्के, आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण असे 62 टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रात आजही आहे. बाकी राज्यांमध्ये हीच मर्यादा 72 टक्‍यांपर्यंत आहे, मग मराठा समाजाला आरक्षण देत असताना ही मर्यादा का आठवावी? हा विचार साकल्याने झालेला दिसत नाही. समन्यायी वगैरे या केवळ पुस्तकी बाबी झाल्या आहेत. पूर्वग्रह बाळगून मराठा समाजाला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: आता पालकमंत्री नसलात तरी…; ८ महिन्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ‘पॉवर शिफ्ट’ निर्णय, पण मित्रपक्षांना धक्का

भारतीय संगीतकारांनी केलेली मोठी चूक ! भरपाई म्हणून ऑफर केलं पाकिस्तानी गायिकेला गाणं; आजही आहे सुपरहिट

Theur Crime : अकरावीच्या विद्यार्थिनीवर वर्गातीलच अल्पवयीन मित्राकडून वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यावर प्रकार आला उघडकीस

Latest Marathi News Updates : वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ ला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश देणार

India vs Pakistan Asia Cup : 'आशिया कप'मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणे भारताची मजबूरी का आहे? माजी क्रीडामंत्र्यांनीच सांगितलं नेमकं कारण

SCROLL FOR NEXT