The study of children taking Anganwadi workers on the background of Corona 
सोलापूर

दिवसभर घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण अन्‌...

सुस्मिता वडतिले

सोलापूर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही.  दररोज रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.  त्यामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या दिवसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून राज्यात घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्यात आले. आता त्यांचे इतर कामांबरोबर स्मार्टफोनद्वारे कामे सुरू आहेत. याबरोबर मुलांचे अभ्यासातून दुर्लक्ष होऊ नये, यासाठी पालकांचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार करुन अभ्यास घेतला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार त्या कर्तव्यावर उभ्या आहेत.
कोरोना विषाणूच्या संकट काळात संपूर्ण जग विलक्षण ताण तणावात आहे. अंगणवाडी कर्मचारी स्वतः च्या कर्तव्याची जाण ठेवून कामे करत आहे. त्यामध्ये सर्व्हे करताना घरोघरी जाऊन दररोज घरात कोण आजारी आहे का? बाहेर गावाहून कोणी दाखल झाले आहे का? याची माहिती संकलित करण्याचे काम करीत आहेत. काही दिवस कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्व्हेचे काम सुरू राहणार आहे. त्यात कोरोनाचे काम करत असताना त्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर मुलांना कच्चा आहार वाटपाची जबाबदारी आहे. एकीकडे लॉकडाऊनची बंधने तर दुसरीकडे दैनंदिन खर्चासाठी पैसे नाहीत, अशा कात्रीत अंगणवाडी कर्मचारी अडकले आहेत.  हे सर्व अंगणवाडी कर्मचारी लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती, कोरोना विषयक सर्व्हे, लोकशिक्षण सल्ला, आरोग्याची काळजी घेणे, असे महत्त्वपूर्ण काम अंगणवाडी सेविकांना अनेक ठिकाणी जावून जीवाची पर्वा न करता करावी लागत आहेत.

सेविकांची कामे
- मुलांची हजेरी घेणे.
- लसीकरण करणे
- गृहभेटी करणे 
-  घरोघरी जाऊन टीएचआर वाटप करणे.
- जास्त गर्दी होऊ नये म्हणून रोज चार ते पाच मुलांची वजन घेणे.

असाही मुलांचा अभ्यास सुरू
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यासातून दुर्लक्ष होऊ नये. यासाठी स्मार्टफोनवर पालकांचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये पालकांशी चर्चा करून मुलांकडून चिकन मातीची वस्तू बनवणे, रंग ओळखणे, नातेसंबंध ओळखणे, गोष्टीं सांगणे, मुलांना वस्तूंची ओळख करून देणे, असा अभ्यास विद्यार्थ्यांकडून अंगणवाडी सेविका करून घेत आहेत. कोरोना विषाणूच्या या संकट काळात संपूर्ण जग हे विलक्षण ताण तणावात असूनही महाराष्ट्र शासनातील अंगणवाडी कर्मचारी काम करत आहेत. त्यात अंगणवाडीची कामे करण्यासाठी स्मार्टफोन काम करण्याची परवानगी दिली आहे. परंतु काही सेविकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन नाही. त्यांना कामाची सक्ती करू नका. आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांना सर्व्हे करण्यासाठी फक्त एक हजार रुपये मानधन दिले आहे, तेही फार कमी आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे कर्मचारी काम करीत आहेत.
- सूर्यमणी गायकवाड, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

स्मार्टफोनद्‌वारे काम
एकीकडे लॉकडाऊनची बंधने तर दुसरीकडे दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे आमच्या मनात भीती, दडपण असूनही जीव धोक्यात घालून सर्व्हे करण्यासाठी तयार झालो आहोत. तसेच अंगणवाडीतील कामे स्मार्टफोन द्वारे सुरू आहेत.  सध्या मुलांची हजेरी घेणे, टीएचआर वाटप करणे गृहभेटी करणे, पालकांना फोन करणे ही कामे सुरू आहेत. 
- सुरेखा पोळ, अंगणवाडी सेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT