agriculture subsidy
agriculture subsidy esakal
सोलापूर

Solapur News : सव्वापाच हजार शेतकऱ्यांना साडेछत्तीस कोटी वितरित

सकाळ वृत्तसेवा

घटत असलेली जमीन धारण क्षमता, कमी झालेली बैल आणि मजुराची संख्या, वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये, फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे.

सोलापूर - वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत असलेली जमीन धारण क्षमता, कमी झालेली बैल आणि मजुराची संख्या, वाढते मजुरीचे दर, पिकांमध्ये, फळबागांमध्ये असलेली विविधता यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमधून २०२२-२३ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील ५ हजार २४२ शेतकऱ्यांना विविध अवजारे व यंत्रांसाठी ३६ कोटी, ५१ लाख, ८६ हजार, १८३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी ही माहिती दिली.

बाळासाहेब शिंदे म्हणाले, केंद्र शासनाने वेळोवेळी अद्ययावत केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, पौष्टिक तृणधान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - गळीत धान्य, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्ये, राष्ट्रीय कृषी विकास योजना - कृषी यांत्रिकीकरण, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत विविध साधनांचा पुरवठा करण्यात येत आहे.

या योजनेतून आतापर्यंत ९ हजार ३९६ शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात आली होती. त्यापैकी ७ हजार ३४६ शेतकऱ्यांनी अवजारे, यंत्रे खरेदीची बिले ऑनलाइन सादर केली आहेत. ३१ मार्चपर्यंत त्यापैकी ५ हजार २४२ शेतकऱ्यांच्या बिलाची पडताळणी होऊन त्यांना ३६ कोटी ५१ लाख ८६ हजार १८३ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित बिलांची पडताळणी व अनुदान वितरणाची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.

तालुकानिहाय शेतकरी व अनुदान

उत्तर सोलापूर - २२९ शेतकऱ्यांना ८८ लाख ७७ हजार ४२ रुपये, दक्षिण सोलापूर - २७७ शेतकऱ्यांना १ कोटी ८६ लाख ६३ हजार ६६१ रुपये, मोहोळ - ५२५ शेतकऱ्यांना ३ कोटी ६६ लाख ६२ हजार २५९ रुपये, अक्कलकोट - २८२ शेतकऱ्यांना २ कोटी ३६ लाख ९५ हजार ३३२ रुपये, बार्शी - ५५३ शेतकऱ्यांना ४ कोटी ५४ लाख २९ हजार ३८१ रुपये, माढा - ६१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८२ लाख ४७ हजार ६३० रुपये, करमाळा - ७२१ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख २० हजार ७७९ रुपये, पंढरपूर - ५२४ शेतकऱ्यांना ३ कोटी ४७ लाख ४९ हजार रुपये, सांगोला - ६७० शेतकऱ्यांना ३ कोटी ९९ लाख ८७ हजार २५३ रुपये, मंगळवेढा - ५७३ शेतकऱ्यांना ३ कोटी ८२ लाख १२ हजार ६६८ रुपये आणि माळशिरस - ३६९ शेतकऱ्यांना २ कोटी ४४ लाख ४१ हजार १६६ रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT