Thackerey.
Thackerey. 
सोलापूर

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक बदल! कोरोनामुळे स्वागताला तिघेच 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. 

त्यांचे नुकतेच सोलापूर विमानतळावर आगमन झाले असून ते अक्कलकोटकडे रवाना झाले आहेत. सोलापूर विमानतळावरून ते शासकीय विश्रामगृह येथे काही काळ थांबणार होते. त्यानंतर ते अक्कलकोटला जाणार होते, मात्र सोलापूर विमानतळावर त्यांचे अर्धा तास उशिराने आगमन झाल्याने त्यांच्या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला आणि त्यांनी विमानतळावरून थेट अक्कलकोटला जाणे पसंत केले. 

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार दिलीप माने हे उपस्थित होते. कोरोनामुळे उर्वरित पदाधिकाऱ्यांना विमानतळाबाहेर थांबवण्यात आले होते. 

मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आदी उपस्थित होते. महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार प्रणिती शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, दिलीप माने यांचे स्वागत केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT