सोलापूर

काकांनी केलेल्या नियुक्तीला दादांचा खो

सकाळ वृत्तसेवा

जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी केलेल्या नियुक्तीला कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी स्थगिती आणली आहे.

सोलापूर: जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उघडउघड दुफळी निर्माण झाली असून, नुकत्याच मोहोळ येथे झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीमधील गटबाजी पुन्हा उघड झाली आहे. जिल्हाध्यक्ष व कार्यकारी अध्यक्ष यांच्यातही एकमत नसल्याचे दिसून आले. जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी केलेल्या नियुक्तीला कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी स्थगिती आणली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी बिपीन करजोळे यांची निवड केली होती. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सध्या नागरिकांचा जनता दरबार संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये राबवत आहेत. असे असताना दक्षिण तालुक्‍याचे नवीन तालुका अध्यक्ष बिपीन करजोळे यांनी कोणताही कार्यक्रम घेतला नाही.

उलट पूर्वीचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी नागरिकांचा जनता दरबार हा कार्यक्रम आयोजित केला. यामुळे उमेश पाटील यांनी वरिष्ठांची बोलून बिपीन करजोळे यांच्या तालुका अध्यक्ष निवडीला तडकाफडकी स्थगिती आणली. त्याबाबत उमेश पाटील यांनी समाज माध्यमातून याबाबतची भूमिका मांडणारा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

स्थगिती आणण्याचे अधिकार कार्यकारी अध्यक्षांना नाहीत. हे अधिकार अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांना आहेत. यामुळे या विषयाला महत्त्व देण्याची आवश्‍यकता नाही.

- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

जो पक्षाचे काम करतो त्याला पदे दिली जातात. ज्यांनी प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तचा कार्यक्रम नाकारला त्यांना कसे पद देता येईल. माझे पद काही नामधारी नाही. मी माझे अधिकार वापरून ही नियुक्तीला स्थगिती आणत आहे.

- उमेश पाटील, कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT