covid center
covid center esakal
सोलापूर

महापालिका म्हणते, डॉक्‍टर व स्टाफची सोय तुम्हीच करा !

अभय दिवाणजी

सेंटर सुरू झाल्यावर काही गैरप्रकार होतील, असे महापालिका प्रशासनास वाटत असेल तर त्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा असणारच आहे. लोक स्वतःहून पुढे येत असताना याबाबतचा विचार होणे गरजेचे आहे.

सोलापूर : गेल्या आठवड्यापासून सोलापूर शहरातील (Solapur City) कोरोनाची (Covid-19) रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली असली तरी, शहरालगत असलेल्या उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळमधील रुग्णसंख्येने चिंतेत वाढ केली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा आणि भविष्याचा विचार करून महापालिकेकडे (Solapur Municipal corporation) विविध लोकप्रतिनिधी आणि संस्थांनी दिलेले कोव्हिड सेंटरसाठीच्या (Covid Center) धूळखात पडून असलेल्या प्रस्तावांबाबत तातडीने निर्णय अपेक्षित आहे. महापालिकेच्या लाल फितीच्या कारभारात हे प्रस्ताव पडून आहेत. लोकसहभाग हा लोकशाहीचा मूळ गाभा आहे. त्यामुळे लोकसहभागातून कोरोनासारख्या महामारीवर मात करणे सोयीचे ठरणार आहे. (The Solapur Municipal corporation has not yet decided on the proposal for the Covid Center)

कोरोना आपत्तीवर उपाययोजना करण्याकामी प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा तोकडीच आहे. शिवाय निधीचाही विचार करावा लागणार आहे. महापालिका प्रशासकीय यंत्रणेला कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार काही लोकप्रतिनिधी व संस्थांनी कोव्हिड सेंटर उघडण्याकामी महापालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. मात्र, महापालिकेतील लाल फितीच्या कारभारामुळे असे प्रस्ताव मार्गी लागत नाहीत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या प्रस्तावास आता दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे. जागेची उपलब्धता, बेड, जेवणाची सोय तसेच आवश्‍यक निधी देण्याची तयारीही बाजार समितीने दर्शविली आहे. परंतु, तज्ज्ञ डॉक्‍टर व स्टाफची सोय तुम्हीच करा, या महापालिकेच्या जाचक अटीमुळे बाजार समितीने काढता पाय घेतला आहे.

काडादी मंगल कार्यालयाप्रमाणे जर तज्ज्ञ डॉक्‍टर व स्टाफची सोय झाली तर या लोकप्रतिनिधी आणि संस्थांना कोव्हिड सेंटर चालविणे सोयीचे जाणार आहे. बाजार समितीवर पणन विभागाचे नियंत्रण आहे. पणन खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार डॉक्‍टर व स्टाफची जबाबदारी घेणे अपेक्षित नाही. ही बाब बाजार समितीने महापालिकेला कळविली आहे. तरीही या सेंटरविषयी अद्यापपर्यंत कसलाही निर्णय झाला नाही. महापालिकेच्या उदासीन भूमिकेचा प्रत्यय अनेक लोकप्रतिनिधींनाही आला आहे. प्रभागनिहाय कोव्हिड सेंटर सुरू झाले तर कोरोनाला रोखण्यात आणखी काही प्रमाणात यश येईल. महापालिका प्रशासनास या प्रस्तावात काही काळेबेरे वाटत असेल तर ते प्रस्ताव तपासावेत. सेंटर सुरू झाल्यावर काही गैरप्रकार होतील, असेही वाटत असेल तर त्यावर नियंत्रण करणारी यंत्रणा असणारच आहे. लोक स्वतःहून पुढे येत असताना याबाबतचा विचार होणे गरजेचे आहे.

सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा

सध्या सोलापूर शहरातील रुग्णसंख्या कमालीची कमी झालेली असली तरी पूर्वीचा अनुभव लक्षात घेता आणि पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्‍यता गृहीत धरून कोव्हिड सेंटर तयार करून ठेवणे क्रमप्राप्तच आहे, हे निश्‍चित! यासाठी महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर, आया व परिचारिकांची सोय करणे लोकप्रतिनिधी व संस्थांना केवळ अशक्‍य आहे. तसेच रुग्णांचे काही कमी- जास्त झाले तर त्या संस्था व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. तुम्ही फक्त डॉक्‍टर, नर्स, आयांची सोय करा बाकी अन्य सोयीसुविधा आम्ही देतो, असे संस्था व लोकप्रतिनिधींनी महापालिकेकडे कळविले आहे. यातून काहीतरी मधला मार्ग काढून सेंटर सुरू करावे लागणार आहे. आजतागायत तरी महापालिकेने कोणत्याही प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! टोल नाक्यावर 160 रूपयांसाठी वाद; महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चढवली कार अन्...VIDEO VIRAL

IPL 2024 Playoffs : प्लेऑफच्या शर्यतीतून 3 संघ बाहेर, 1 क्वालिफाय, 'या' 6 संघाचे मालक टेन्शनमध्ये

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Weather Updates: यंदा मान्सून कधी होणार दाखल? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली माहिती, अंदमानमध्ये 'या' तारखेला एन्ट्री

मोठी बातमी! अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार भरपाई; काय आहे योजना, कोठे करायचा अर्ज; राज्यात सोलापुरातून पहिली शिफारस

SCROLL FOR NEXT