Crime Chori Esakal
सोलापूर

शिक्षिकेच्या घरात भरदुपारी १५ लाखांची चोरी! १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास; अवघ्या काही तासांत पोलिसांनी चोरटा पकडला

सोलापुरातील चाटला चौकाजवळील जोडभावी पेठ परिसरातील शिक्षिकेच्या वीरभद्र निवासच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून चोरट्याने भरदिवसा १४ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दीडच्या सुमारास ही चोरी झाल्याची फिर्याद सुरेखा विठ्ठल तोडकरी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : येथील चाटला चौकाजवळील जोडभावी पेठ परिसरातील शिक्षिकेच्या वीरभद्र निवासच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातून चोरट्याने भरदिवसा १४ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दीडच्या सुमारास ही चोरी झाल्याची फिर्याद सुरेखा विठ्ठल तोडकरी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्यातील संशयितास अवघ्या काही तासांत ताब्यात घेऊन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शनिवारी सकाळच्या सत्रात शाळा असल्याने फिर्यादी शिक्षिका शाळेला गेल्या होत्या. घरातील त्यांचा मुलगा शुभम हा सकाळी दहाच्या सुमारास मित्रांना भेटण्यासाठी घर बंद करून बाहेर गेला. दुपारी एक-दीडच्या सुमारास तो घरी परतला. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावरील घराचे कुलूप कोणीतरी तोडले होते. घरातील बेडरुममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. घरातील १५ तोळे दागिने व २३ हजार रुपयांची रोकड घरात नव्हती.

चोरीची खबर मिळताच सहायक पोलिस आयुक्त राजन माने, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संशयितास अवघ्या काही तासांत पकडले. चोरट्याचे नाव, त्याच्याकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाची माहिती पोलिस उद्या (सोमवारी) देणार आहेत.

तोंडाला काहीही न बांधता चोरी

अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या चोरट्याने कुलूपबंद असलेल्या घराला टार्गेट करीत सुरेखा तोडकरी यांच्या घरात चोरी केली. चोरटा परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आणि तोंडाला काहीही न बांधता शिक्षिकेच्या घरात चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आणि त्यास काही तासांतच पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT