atm ATTACK.jpg Sakal
सोलापूर

रखवालदाराने उधळवला टेंभुर्णीतील ATM पळवून नेण्याचा चोरट्यांचा डाव!

रखवालदाराने उधळला टेंभुर्णीतील ATM पळवून नेण्याचा चोरट्यांचा डाव!

संतोष पाटील

टेंभुर्णी शहरातील करमाळा रस्त्यावरील हांडे कॉम्प्लेक्‍समध्ये असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे एटीएम मशिन सहा ते सात चोरट्यांनी पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

टेंभुर्णी (सोलापूर) : टेंभुर्णी शहरातील (Tembhurni) करमाळा रस्त्यावरील हांडे कॉम्प्लेक्‍समध्ये असलेल्या एचडीएफसी बॅंकेचे (HDFC Bank) एटीएम (ATM) मशिन सहा ते सात चोरट्यांनी (Thieves) पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. एटीएम मशिनला वायररोप बांधून जीपच्या साह्याने ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न चोरटे करीत होते. त्यावेळी एटीएमच्या रखवालदाराने प्रसंगावधान राखून जीपवर दगडफेक करून आरडाओरड केला व त्याच वेळी एटीएम मशिनला बांधलेला वायररोप अचानक तुटल्याने चोरट्यांचा डाव फसला. त्यामुळे चोरट्यांनी जीपसह पलायन केल्याने एचडीएफसी बॅंकेची एटीएममधील लाखो रुपयांची रक्कम वाचली.

रविवारी (ता. 17) पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, टेंभुर्णी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. याविषयी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी शहरात करमाळा रस्त्यावरील हांडे कॉम्प्लेक्‍समध्ये एचडीएफसी बॅंकेची शाखा असून, या शाखेत बॅंकेचे एटीएम मशिन आहे. या एटीएम मशिनच्या रक्षणासाठी पंचरत्न लोंढे (वय 21, रा. माळेगाव, ता. माढा) हा रखवालदार रात्रपाळीत ड्यूटीवर होता. रविवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास तो शौचास गेला होता. त्यावेळी येथील करमाळा चौकातून एक पांढऱ्या रंगाची जीप आली. त्यातून एक अनोळखी इसम उतरला. त्यावेळी रखवालदार लोंढे यास ते एटीएममधून रक्कम काढण्यासाठी आले असावेत असे वाटले. पण काही क्षणात त्यातील इतर जणांनी एटीएम मशिनला वायररोप बांधून ओढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे रखवालदार तेथे पळत आला व त्याने आरडाओरड करीत गाडीवर दगड मारण्यास सुरवात केली. जीपने एटीएम मशिन दीडशे फूट ओढत नेले; पण त्यावेळी एटीएम मशिनला बांधलेला वायररोप अचानक तुटला.

रखवालदाराने आरडाओरड केल्याने शेजारील लोक जागे झाल्याचे लक्षात येताच चोरटे जीपमधून पळून गेले. यामुळे एटीएम मशिन व त्यातील लाखोंची रक्कम वाचली. जीपचा नंबर समजू शकला नाही. या घटनेची माहिती समजताच रात्रगस्तीचे पोलिस तेथे आले. दरम्यान, बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना कळविल्याने तेही आले. शाखाधिकारी सोमनाथ उंबरे यांनी एटीएम मशिनचे अंदाजे हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार भीमराव गोळेकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT