बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार! दोघांना अटक esakal
सोलापूर

बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार! दोघांना अटक

बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार! दोघांना अटक

प्रशांत काळे

शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहणाऱ्या माजी नगरसेवकाच्या घरावर गुरुवारी रात्री बाटल्या, दगडफेक करून गोळीबार झाला.

बार्शी (सोलापूर) : शहरातील सुभाषनगर भागातील वाणी प्लॉट येथे राहणाऱ्या माजी नगरसेवकाच्या घरावर गुरुवारी रात्री बाटल्या, दगडफेक करून गोळीबार (Firing) झाला असून, एक जिवंत काडतूस (Bullet) व एक रिकामे झालेले काडतूस बंगल्याच्या आवारात सापडले आहे. बार्शी शहर पोलिसांत (Barshi City Police) चौघा जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नागेश चव्हाण, सोमा कदम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून, सोन्या हाजगुडे, विपुल यादव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडली. विशाल वाणी यांनी फिर्याद दाखल केली.

नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विनोद वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांचा मित्र विकी जाधव यांच्याशी विपुल यादव याचे 29 नोव्हेंबर रोजी भांडण झाले होते. हे भांडण विशाल यादव यांनी आपापसात मिटवले होते. गुरुवारी मध्यरात्री चौघांनी येऊन घरावर बाटल्या तसेच दगडफेक करीत वाणी घराबाहेर ये, अशी धमकी देत शिवीगाळ करून आणलेल्या पिस्टलमधून गोळीबार केला. त्यामध्ये एक गोळी झाडली तर एक जिवंत काडतूस सापडले आहे. ते पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार करीत आहेत.

दरम्यान, माजी नगरसेवक विनोद वाणी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भाऊ विशाल टीव्ही पाहात बसला होता. घरासमोर येऊन समाजकंटकांनी बिअरच्या बाटल्या फोडल्या, दगडफेक केली, गेटवरून चढून येण्याचा प्रयत्न केला; तसेच शिवीगाळ करीत पिस्टलमधून गोळीबार केला. दोन फायर केल्यानंतर एक रिकामे काडतूस तर एक जिवंत काडतूस सापडले असून, पोलिसांना फोन करताच पोलिस दहा मिनिटांत आले. तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. पोलिसांच्या ताब्यात काडतूस दिले आहेत.

ही घटना राजकीय असून याचा सूत्रधार कोण आहे, हे पोलिस तपासातून निष्पन्न होईल. तपास योग्य दिशेने सुरू असून पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक घटनास्थळी भेट देऊन गेले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक येत आहेत, अशी माहिती मिळाली. पूर्ण तपास करून न्याय द्यावा, ही आमची मागणी आहे, असे विनोद वाणी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT