Jinti theif 
सोलापूर

जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांच्या घरी 2.95 लाखांच्या दागिन्यांची चोरी ! 

संतोष केसकर

जिंती (सोलापूर) : जिंती (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी भोसले यांच्या घरी चोरी झाली आहे. सोन्याचा नेकलेस, इतर दागिने व एक लाख 25 हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख 95 हजार रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद शहाजीराजे उमाजी राजेभोसले यांनी करमाळा पोलिसांत दिली आहे. 

जिंती गावात रविवारी पहाटे सव्वातीन वाजता चोरांनी राजेभोसले यांच्या वाड्यामध्ये चोरी केली. लक्ष्मी पूजनानिमित्त राजेभोसले यांनी देवघरात दागिने व पैशाचे पूजन केले होते. हे पूजन केलेले पैसे व दागिने चोरांनी पळवले आहेत. वाड्यामध्ये सीसीसीटीव्ही असल्यामुळे चोरट्यांचे सीसीटिव्ही फुटेज सापडले आहे. या फुटेजमध्ये सहा चोर दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. या चोरीच्या तपासासाठी सोलापूर येथून श्‍वानपथक मागविले होते. श्‍वानाने चोराचा माग काढला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

मागील आठवड्यात मकाई कारखाना येथे बिअर बार फोडण्याचा प्रयत्न झाला होता. पश्‍चिम भागात शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरणे, जनावरांच्या चोऱ्याचे प्रकार वाढले आहेत. जिंती गावात पोलिस औटपोस्ट असूनसुद्धा चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांचा चोरट्यांना धाक राहिलेला नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे. या भागात मागील दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. भिलारवाडी व जिंती परिसरात विद्युतपंप चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 

या घटनेची माहिती देताना शहजी राजेभोसले म्हणाले, लक्ष्मी पूजनानिमित्त देवघरात दागिने व पैशांची पूजा केली होती. मी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी उठलो असता मला देवघराच्या खिडकीपाशी अनोळखी इसम दिसला. तो चोर होता. मी आवाज दिल्यावर चोर पळाले. एकूण सहाजण होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Down Worldwide: जगभरातील लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद

Latest Marathi News Live Update : चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका

आजचे राशिभविष्य - 18 फेब्रुवारी 2026

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्री व्याघ्र-लास्ट वाइल्डरनेसमध्ये सामंजस्य करार; मानव व वन्यजीव सहअस्तित्व होणार बळकट!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT