Vaccine
Vaccine Gallery
सोलापूर

लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली! केंद्रे बंद करण्याची नगरसेवकांची विनंती

सकाळ वृत्तसेवा

शहरात मुबलक प्रमाणात आणि ऑफलाइन पद्धतीने लसींची उपलब्धता होत असल्याने, लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली आहे.

सोलापूर : शहरात मुबलक प्रमाणात आणि ऑफलाइन पद्धतीने लसींची Covid Vaccine) उपलब्धता होत असल्याने, लसीकरण केंद्रावरील (Vaccination Center) गर्दी ओसरली आहे. प्रारंभीच्या काळात प्रभागात लसीकरण (Vaccination) केंद्र सुरू करण्याची वाढली होती. आता केंद्रावरील गर्दी ओसरल्याने नगरसेवक केंद्र बंद करण्यासाठी विनंती पत्र महापालिका प्रशासनाकडे देत आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी 19 जानेवारी रोजी शासनाकडून पहिल्या टप्यात 34 हजार कोविशिल्ड लस प्राप्त झाली. त्यातील शहरासाठी पाच हजार लसी देण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात आरोग्य, प्रशासकीय सेवेतील कर्मचारी आदी फ्रंटलाइन वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. आतापर्यंत शहरासाठी 5 लाख 28 हजार लसी प्राप्त झाल्या. वय वर्षे 60 च्या पुढील, वय वर्षे 45 च्या पुढील असे टप्प्या - टप्प्याने नागरिकांच्या लसीला प्राधान्य देण्यात आले. दोन डोसमधील कालावधी ही 28 दिवसांची होती. शहरात केवळ नागरी आरोग्य केंद्रामध्ये लसीची उपलब्धता असल्याने नागरिकांची गर्दी वाढली होती. कोरोनाचा कहर कायम व लसींचा तुटवडा यामुळे दरम्यानच्या काळात केंद्रांवर लसीसाठी हाणामारीचे प्रसंगही उद्‌भवले. 1 मे पासून वैद्यकीय नियमांत बदल करत शासनाने दोन लसींमधील अंतर 84 दिवसांपर्यंत वाढविले आणि पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासह खासगी दवाखाने, प्रभागनिहाय केंद्र उभारण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून लसींचा मुबलक साठा शहरासाठी उपलब्ध होऊ लागला. वय वर्षे 18 च्या पुढील सर्वच व्यक्‍तींना लसीकरणाची मुभा मिळाली. शहरात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्या वतीने लसीकरण शिबिराला सुरवात झाली. त्यामुळे केंद्रांवरील गर्दी आता ओसरू लागली आहे. सुरवातीला ज्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे खटाटोप करून लसीकरण केंद्र मिळविले होते, तेच नगरसेवक आता लसीकरण केंद्र बंद करण्याची विनंती पत्रे महापालिकेला देत आहेत.

अशी आहे शहराची गरज

  • वय वर्षे 18 च्या पुढील लोकसंख्या : 7 लाख 34 हजार

  • प्रत्येकी दोनप्रमाणे आवश्‍यक लस : 15 लाख 68 हजार

  • आतापर्यंत उपलब्ध झालेले डोस : 5 लाख 28 हजार 790

  • शहराची गरज : 10 लाख 39 हजार 210

  • लसीकरणाचे सध्याचे नियोजन

  • शहरात एकूण केंद्र : 50

  • प्रतिदिवस उपलब्ध डोस : 12 हजार 500

1 लाख 62 हजार लोक सुरक्षित

वय वर्षे 18 च्या पुढील एकूण 7 लाख 34 हजार व्यक्‍तींपैकी 1 लाख 62 हजार 187 जण लसीचे दोन डोस घेऊन सुरक्षित झाले. तर पहिला डोस घेतलेल्या व्यक्‍तींची संख्या 3 लाख 66 हजार 603 इतकी आहे.

लसीचा तुटवडा आणि केंद्रांची संख्या सुरवातीला कमी होती. आता मुबलक प्रमाणात डोस उपलब्ध होत आहेत. योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. वयोवृद्धांसाठी घरोघरी लस उपलब्ध करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे केंद्रावरील गर्दी ओसरल्याचे दिसून येते.

- धनराज पांडे, उपायुक्‍त सोलापूर महापालिका

पूर्वी ऑनलाइन बुकिंग, महापालिका केंद्रावर लस असल्याने तीन महिन्यात आमचा कधी नंबर आलाच नव्हता. आता केंद्रांची संख्या वाढविण्याबरोबर ऑफलाइन लस मिळाल्यामुळे लस सहज उपलब्ध होत आहे. नंबर लावून ताटकळत बसण्याची गरज नाही.

- सुनील पाटील, नागरिक

पहिल्या डोसवेळी महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर आम्ही दिवसभर बसून लस घेतली. त्या वेळी कोणाचीही मदत नव्हती. आता गल्लीबोळात केंद्र उभारण्यात आले आहेत. दुसरा डोस अगदी दहा मिनिटांत मिळाला.

- अप्पाराव बिराजदार

बातमीदार : प्रमिला चोरगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT