प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून

प्रेमाचं आमिष दाखवून जानेवारी 2015 ते मे 2021 या कालावधीत राज्यभरात अल्पवयीन मुले व मुलींना पळवून नेल्याचे जवळपास 48 हजार 749 गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून
Canva
Summary

सोलापूर : माझे तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे, आई-वडील विवाहाला परवानगी देणार नाहीत, आपण दोघे लग्न करू, यासह काही आमिषे दाखवून जानेवारी 2015 ते मे 2021 या कालावधीत राज्यभरात अल्पवयीन मुले व मुलींना पळवून नेल्याचे जवळपास 48 हजार 749 गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत. त्यात 34 हजार 301 मुलींचा तर अंदाजित 15 हजार 593 मुलांचा समावेश असून, चार हजाराहून अधिक मुले-मुली अजूनही सापडले नाहीत, अशी माहिती पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून
ढीगभर झाले मंत्री, पण सोलापुरात नाही आयटी अन्‌ ऑटोमोबाईल कंपनी

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊ लागली आहे. अल्पवयीन मुले आणि मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत. राज्यात मुंबईत दरवर्षी सर्वाधिक दोन हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत आहेत. दुसरीकडे, 18 वर्षांवरील महिला, मुली, तरुण बेपत्ता होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नांदेड, कोल्हापूर, पिंपरी- चिंचवड, पुणे शहर-ग्रामीण, नगर, गोंदिया, सोलापूर ग्रामीण व शहरातही अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे गुन्हे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. चिंतेची बाब म्हणजे, अल्पवयीन मुलींच्या अत्याचारातही वाढ झाली असून सोलापूर शहरात पोस्को व विनयभंगाचे यावर्षी 79 गुन्हे दाखल झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. राज्यातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर रिक्‍त पदे असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतरही ते आणखी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे बेपत्ता अथवा अपहरण झालेल्यांचा शोध घ्यायला विलंब लागत असल्याचेही बोलले जात आहे. राज्यभरात असे प्रकार होऊ नयेत म्हणून निर्भया पथकांची नियुक्‍ती केली, परंतु त्यांचे काम अपेक्षेप्रमाणे दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी ठोस धोरणांची गरज आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रेमाच्या आमिषेतून 34 हजार अल्पवयीन मुलींना नेले पळवून
आत्मविश्वासातून पिकवले सोने! वीस दिवसात साठ हजारांचे उत्पादन

पालकांनी अल्पवयीन मुला-मुलींना विश्‍वासात घेऊन त्यांना वेळोवेळी धीर द्यायला हवा. त्यांच्याशी संवाद ठेवून, त्यांच्या मनातील बदल ओळखायला हवेत. पालकांनी त्यांची मते त्यांच्यावर लादू नयेत, त्यांच्या स्वप्नाला वाव द्यावा. अल्प वयात पळून गेल्यानंतर दोघांचेही आयुष्य कसे बरबाद होतात, याबद्दल निर्भया पथकाद्वारे ऑनलाइन जनजागृती केली जात आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर

'अल्पवयीन'चे अपहरण (जानेवारी 2015 ते मे 2021)

  • एकूण गुन्हे : 48,749

  • पळवून नेलेल्या मुली : 34,301

  • पळवून नेलेले मुले : 15,593

  • न सापडलेली मुले-मुली : 4,292

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com