There is no settlement on Kovid Hospital in Pandharpur political squabbles continue
There is no settlement on Kovid Hospital in Pandharpur political squabbles continue 
सोलापूर

पंढरपुरातील कोविड हॉस्पिटलवर तोडगा नाहीच; राजकीय कुरघोडी सुरूच 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : शहर व तालुक्‍यातील सहा व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आलेले असताना येथील आमदार भारत भालके आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या एकमेकांवरील कुरघोड्या चालूच आहेत. त्यामुळे कोविड 19 हॉस्पिटल कुठे करावयाचे यावरचा तोडगा आजही निघू शकला नाही. प्रशासनाचे खच्चीकरण करण्याचे काम आजही सुरू आहे. 
सुरवातीच्या काळात येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल उभारण्यास आमदार भारत भालके यांनी विरोध दर्शवला होता. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास विरोध झाल्यानंतर आता आमदार भालके यांनी उपजिल्हा रुग्णालयात covid-19 हॉस्पिटल करण्यास सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे नगरपालिकेने शहरात खरेदीसाठी एकाच वेळी नागरिकांची गर्दी होऊ नये याकरिता शहरातील दुकानांवर ए, बी, सी, डी असे मार्किंग करून वेगवेगळ्या दिवशी वेगळी दुकाने उघडण्याचे नियोजन केले होते. परिचारक गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार भालके यांच्यावर ते निष्क्रिय असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त आमदार श्री. भालके यांनी नगरपालिकेने केलेले नियोजन आम्हाला मान्य नाही. नगरपालिकेने रस्त्यावर बसणारे विक्रेते, हातगाडीवर विक्री करणारे व्यापारी यांचा विचार केलेला नाही, त्यामुळे आपला विरोध आहे, अशी भूमिका घेऊन नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक गटाला शह दिला होता. 
या पार्श्‍वभूमीवर आज आमदार श्री. भालके यांनी कोरोनाग्रस्तांसाठी यमाई तलावाजवळील त्यांचा बंगला गरज पडल्यास वापरास देण्याची भूमिका व्यक्त केली होती. त्याला आमदार प्रशांत परिचारक यांनी लगेचच प्रतिउत्तर दिले आहे. मागील 100-150 वर्षांत पंढरपुरात अनेक वेळा कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू अशा रोगाच्या साथी यात्रांच्या काळात आल्या होत्या. परंतु, नगरपालिकेने सक्षमपणे काम करून शहराला या आजारांपासून मुक्त केले होते. त्यामुळे सद्यस्थितीत कोणी घरदार देण्याची गरज नाही, असा टोला आमदार परिचारक यांनी आमदार भालके यांचे नाव न घेता लगावला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर निशाणा

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT