Train 
सोलापूर

तीर्थक्षेत्रांना जाणार कसे? कुर्डुवाडीहून नाही पंढरपूर, मिरज, कोल्हापूरकडे जाणारी एकही रेल्वे 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : लॉकडाउननंतर कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी सध्या फक्त 10 विशेष अप व 10 विशेष डाउन गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर, मिरज व कोल्हापूरकडे जाणारी एकही रेल्वे सुरू केली नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूरकडे किमान एक विशेष गाडी त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. 

लॉकडाउनच्या काळात प्रवासी वाहतूक पूर्ण ठप्प होती. अनलॉकमध्ये काही विशेष प्रवासी गाड्यांना धावण्यासाठी परवानगी मिळाली. जिल्ह्यातील सोलापूरनंतर सर्वात महत्त्वाचे व मोठे असलेल्या कुर्डुवाडी स्थानकावरून फक्त 10 गाड्या अप-डाउन धावत आहेत. या गाड्या सोलापूर, मुंबई, लातूर या दिशेने धावतात. कुर्डुवाडीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पंढरपूर या तीर्थक्षेत्राकडे तसेच सांगोला, मिरज, कोल्हापूर याकडे धावणारी एकही रेल्वे सुरू झालेली नाही. त्यामुळे त्या भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कुर्डुवाडी व परिसरातील नागरिकांना कामानिमित्त, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, उपचारासाठी रुग्णांना मिरज येथे जावे लागते. परंतु सध्या गाड्या बंद असल्याने प्रवाशांची अडचण झाली आहे. या मार्गावरील किमान एखादी विशेष गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

मिरज, कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात यासह इतर मागण्यांचे निवेदन रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना दिले आहे. गाड्या सुरू करून प्रवाशांची गैरसोय टाळावी. 
- विजयसिंह परबत, 
अभियंता, कुर्डुवाडी 

पंढरपूर, मिरज, कोल्हापूरला जाण्यासाठी रेल्वे सुरू करून प्रवाशांची अडचण दूर करावी; अन्यथा लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. 
- हर्षद मोरे, 
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा प्रवासी संघ, कुर्डुवाडी 

सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्या 
मुंबई- बंगळूर उद्यान एक्‍स्प्रेस (अप-डाउन), हैदराबाद - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), दिल्ली - बंगळूर कर्नाटक एक्‍स्प्रेस (अप-डाउन), मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्‍स्प्रेस (अप-डाउन), सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस (अप-डाउन), मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्‍स्प्रेस (अप-डाउन), लोकमान्य टिळक टर्मिनस - शालिमार कुर्ला एक्‍स्प्रेस (अप-डाउन), गदग - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), लातूर - मुंबई एक्‍स्प्रेस (अप-डाउन), पनवेल - नांदेड एक्‍स्प्रेस (अप-डाउन) यापैकी काही गाड्या दिवसा तर काही रात्रीचा प्रवास करतात. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मला चामड्याच्या पट्ट्याने मारलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

Latest Marathi Live Update: सहा तासांत कार चोरीचा उलगडा; दोन आरोपी अटकेत

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

SCROLL FOR NEXT