जिल्ह्यात वाढणार 35 नगरसेवक! Sakal
सोलापूर

जिल्ह्यात वाढणार 35 नगरसेवक! जुन्या दहा नगरपरिषदांचा समावेश

जिल्ह्यात वाढणार 35 नगरसेवक! बार्शी, पंढरपूरसह जुन्या दहा नगरपरिषदांचा समावेश

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

सोलापूर जिल्ह्यातील दहा जुन्या नगर परिषदांमध्ये तब्बल 35 नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर : राज्यात झपाट्याने वाढलेली लोकसंख्या, नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका व नगर परिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत 17 टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत झाला आहे. या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) दहा जुन्या नगर परिषदांमध्ये तब्बल 35 नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

कोरोनामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखीन काही कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरून अधिनियमात नमूद केलेल्या महापालिका व नगरपरिषदांमधील किमान सदस्य संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ही एकमेव नगरपरिषद अ वर्गात आहे. ब वर्गाच्या नगरपरिषदांमध्ये पंढरपूर व अक्कलकोट नगरपरिषदांचा समावेश आहे. सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ या सात नगरपरिषदा क वर्गात मोडतात. शासनाने सदस्य संख्या वाढीचा निर्णय हा महापालिका व नगरपरिषदांसाठी घेतला आहे. नगर पंचायतींना हा निर्णय लागू होणार की नाही? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे नगरसेवकांच्या सदस्य संख्या वाढीचा लाभ नगरपंचायतींना मिळण्याची शक्‍यता कमीच आहे.

बार्शीत सहा, पंढरपुरात पाच नगरसेवक वाढणार

सध्या नगरपरिषदांध्ये जनतेतून निवडून येण्यासाठी असलेल्या एकूण जागांमध्ये 17 टक्के सदस्य वाढणार आहेत. त्यामुळे बार्शीत सहा, पंढरपूरमध्ये पाच, अक्कलकोटमध्ये चार नगरसेवक वाढण्याची शक्‍यता आहे. सांगोला, मंगळवेढा, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, दुधनी या नगरपरिषदांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक वाढण्याची शक्‍यता आहे. मोहोळ नगरपरिषदेत दोन नगरसेवक वाढण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात सध्या दहा नगरपरिषदांमधून 265 नगरसेवक जनतेतून निवडून येतात. त्यामध्ये आता 35 जागांची भर पडण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT