solapur court building
solapur court building esakal
सोलापूर

चिमुकला फितूर, बहिणीने साक्ष फिरवली तरीपण, शिक्षिका पत्नीच्या खूनप्रकरणी शिक्षक पतीला जन्मठेप

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : कर्जबाजारीपणाला कंटाळून शिक्षिका पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून करणाऱ्या शिक्षक पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी आज (ता. १५) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच त्याच्या आठ वर्षीय मुलाला दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याचेही आदेश त्यांनी दिले. विकास विश्वनाथ हरवाळकर (रा. नीता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी विकासने स्वत:बरोबरच शिक्षिका पत्नीच्या नावे कर्ज उचलले होते. शेअर मार्केट, बांधकाम व्यवसायात त्याला मोठा तोटा झाला होता. या कर्जबाजारीपणाला कंटाळून आरोपी विकासने १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास मोबाईलच्या व्हॉट्‌सॲप स्टेट्‌सला फाशीचा दोर असलेले चित्र ठेवून त्याखाली ‘एव्हरीथिंग इज लॉस्ट’ असे इंग्रजीत ठेवले होते. तसेच ‘सॉरी आपल्या विश्वासाला पात्र ठरलो नाही’ असेही लिहिले होते. हे स्टेट्स आरोपीच्या मामाचा मुलगा प्रणय यशवंत कांबळे याने पाहिले.

त्यावेळी त्याने प्रसंगावधान साधून विकासला कॉल केला. पण, त्याने फोन उचलला नाही. त्यावेळी प्रणयने आरोपीचा मोठा भाऊ विलासला ही बाब सांगितली. त्यानंतर नातेवाइकांना कळवून सर्वजण आरोपीच्या घरी पोचले. त्यावेळी घर आतून बंद असल्याने दरवाजा तोडून सर्वजण आत शिरले. पण, तोवर आरोपी विकासने पत्नीचा खून केला होता. पोलिसांना ही बाब सांगितली, पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले.

तोपर्यंत अर्चनाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विकास हरवाळकरविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. न्यायालयाने या प्रकरणाचा अडीच वर्षांतच निकाल दिला. जन्मठेप आणि लहान मुलाला दहा लाखांची मदत देण्याचे आदेश दिले. भरपाईची रक्कम न दिल्यास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षादेखील ठोठावली आहे. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी केला होता. कोर्टपैरवी म्हणून सुनंदा घाडगे यांनी मदत केली.

चिमुकला फितूर, बहिणीने साक्ष फिरवली, पण...

वडिलाने आईचा खून केल्याच्या घटनेतील नेत्र साक्षीदार असलेल्या चिमुकल्याने साक्ष फिरवली. तसेच आरोपीच्या बहिणीने न्यायालयात आरोपीच्या बाजूने साक्ष देत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, उलट तपासात सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी आरोपीच्या बहिणीचा डाव चातुर्याने हाणून पाडला. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सरकारी वकिलांचा अचूक युक्तीवाद

पत्नी व स्वत:च्या नावे कर्ज करून कर्जबाजारी झालेल्या आरोपीने पत्नीचा खून केला होता. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासले गेले. त्यात वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावा, पंचनाम्यावरून आरोपीनेच खून केल्याचे सिद्ध केले. त्यावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप ठोठावली.

- प्रदीपसिंह राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT