Hanumant Mane sakal
सोलापूर

Mohol Accident : आयशर टेम्पोच्या धडकेत टोल नाका कर्मचाऱ्याचा मृत्यु

टोल नाका चुकाविण्यासाठी भरधाव निघालेल्या आयशर टेम्पोने रात्रपाळीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला.

राजकुमार शहा

मोहोळ - टोल नाका चुकाविण्यासाठी भरधाव निघालेल्या आयशर टेम्पोने रात्रपाळीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मोहोळ-पंढरपुर-आळंदी पालखी महामार्गावर पेनुर ता मोहोळ येथील टोल नाक्यावर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला.

हनुमंत अंकुश माने (वय-38), रा. पेनुर असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलिसात अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पेनुर वर शोक कळा पसरली आहे.

पंढरपूर पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत हनुमंत माने हे पेनुर येथील टोल नाक्यावर कार्यरत होते. बुधवारी पाहाटे पंढरपूरहुन सोलापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पो ने हनुमंत माने यांना जोराचे धडक दिली, त्यात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर धोत्रे यांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची खबर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ब्रदर श्री डोके यांनी दिली असून अधिक तपास अंमलदार शेजाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT